...मग उपमुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पाहा, आरआर आबांच्या कन्येचा आदित्यना टोला

...मग उपमुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पाहा, आरआर आबांच्या कन्येचा आदित्यना टोला

यंदा सत्तांतर होणार असल्याने आदित्यना संधी नाही, असा दावा स्मिता पाटील यांनी केला आहे.

  • Share this:

तासगाव, 4 ऑक्टोबर:शिवरायांचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्या आदित्य ठाकरेंनी आधी चांगले काम करून दाखवावे. त्यानंतरच उपमुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पाहावे, असा टोला माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर.आर.पाटील यांची कन्या स्मिता पाटील यांनी लगावला आहे. आबांनी गुटखाबंदी, डान्सबारबंदी केली. फडणवीस आणि मोदींचे सरकारे मात्र उद्योगधंदे बंद करून युवकांना बेरोजगार करत आहे. व्यसनाधीन करण्यासाठी डान्सबारही सुरू करत आहे. यंदा सत्तांतर होणार असल्याने आदित्यना संधी नाही, असा दावा स्मिता पाटील यांनी एका मराठी दैनिकाच्या प्रतिनिधीशी बोलताना केला आहे.

आर. आर. पाटील प्रत्येक वेळी अर्ज दाखल करत असताना मोठे शक्तीप्रदर्शन करत असत. तीच परंपरा कायम ठेवत त्यांची पत्नी सुमनताई पाटील यांनी तासगाव- कवठेमहांकाळ मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. बाजार समितीमधील राष्ट्रवादीच्या कार्यालयातून पदयात्रा निघाली होती. यावेळी स्मिता म्हणाल्या, 'आघाडी सरकारने अनेक चांगल्या योजना राबवल्या. मात्र या योजनांचे नामकरण करण्यातच आताचे सरकार धन्यता मानत आहे. आया-बहिणींवर बलात्काराचे प्रमाण वाढले आहे. सरकार मात्र सत्तेचा दुरूपयोग करून विरोधी पक्षांना संपवण्याचे कारस्थान करत आहे. पण आता जनता शहाणी झाली आहे. त्यामुळे यंदा सत्तांतर अटळ आहे. यंदा सहानुभूती नव्हे तर आपुलकीचे नाते आणि विकासाच्या मुद्यावर आई विक्रमी मतांनी विजयी होईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, गेल्या वेळी आबांच्या निधनामुळे सहानुभूतीची लाट निर्माण झाली होती. त्यामुळे सुमनताई विजयी झाल्या. पण 2015 नंतर साडे चार वर्षांत त्यांनी मतदारसंघात शंभर कोटींचे कामे केली आहे. राज्यात आणि केंद्रात सत्ता नसताना मोठा निधी खेचून आणल्यामुळे मतदार समाधानी असल्याचे स्मिता पाटील यांनी यावेळी सांगितले.

उमेदवारी हुकताच तात्काळ बांधले शिवबंधन..

दुसरीकडे, माजी मंत्री अजतराव घोरपडे यांना भाजपने डावलले. उमेदवारी मिळत नसल्याचे समजताच अजतराव घोरपडे यांनी तात्काळ शिवसेनेचे बंधन मनगटावर बांधून मैदानात उतरले आहे. घोरपडे यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. खासदार संजय पाटील यांनी मेळाव्यात बोलताना आपली संपूर्ण शक्ती घोरपडेंच्या पाठीशी असल्याचे सांगून कार्यकर्त्यांच्या उत्साहात भर घातली आहे.

बाळासाहेबांना 'ते' वचन दिलं होतं, त्याचं काय? उद्धव ठाकरे म्हणतात...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 4, 2019 08:35 PM IST

ताज्या बातम्या