आई-वडील होते ऊसतोड कामगार... भाजपने मुलाला दिली उमेदवारी

आई-वडील होते ऊसतोड कामगार... भाजपने मुलाला दिली उमेदवारी

मोहिते-पाटील गटाचे वर्चस्व असलेल्या माळशिरस (राखीव) विधानसभा मतदार संघातील भाजप उमेदवाराच्या नावाचा सस्पेन्स अखेर संपला.

  • Share this:

वीरेंद्रसिंह उत्पात,(प्रतिनिधी)

पंढरपूर, 6 ऑक्टोबर: मोहिते-पाटील गटाचे वर्चस्व असलेल्या माळशिरस (राखीव) विधानसभा मतदार संघातील भाजप उमेदवाराच्या नावाचा सस्पेन्स अखेर संपला. शेवटच्या टप्प्यात मुख्यमंत्र्यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जाणारे भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष राम सातपुते यांना भाजपने महायुतीची उमेदवारी जाहीर केली आहे. भांबुर्डी या दुष्काळी गावातील एका ऊसतोड कामगाराच्या मुलाला भाजपने आमदारकीचे तिकीट देऊन सध्याच्या राजकीय घराणेशाहीला फाटा दिला आहे. विशेष म्हणजे स्वत: मोहिते-पाटील यांनी यांचे संपूर्णपणे समर्थन केल्याचे दिसत आहे.

राम सातपुते यांची घरची परिस्थिती बेताची होती. माळशिरस तालुक्यातील भांबुर्डीची कायम दुष्काळी गावात राम सातपुते यांचे लहानपण गेले. वडील विठ्ठल सातपुते यांनी ऊस तोडणीचे कष्टप्रद काम करुन मुलांना शिक्षण दिले. शंकर सहकारी साखर कारखान्याकडे विठ्ठल सातपुते हे  1990 ते 1995 पर्यंत ऊस तोडणीचे काम करत होते.

प्राथमिक गावी व माध्यमिक शिक्षणानंतर राम सातपुते हे उच्च शिक्षणासाठी पुणे येथे गेले. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांचा विद्यार्थी संघटनेशी संपर्क आला. तेथूनच त्यांनी विद्यार्थी संघटनेच्या चळवळीला सुरुवात केली. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील काम पाहून राम सातपुते यांना भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्षपद देण्यात आले. पक्षाचे काम करत असताना त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अनेक गरजू लोकांना मदत केली. 'पार्टी विथ व डिफर्नस' हे ब्रिद वाक्य असलेल्या भाजपने खरंच त्यांच्या कामाची दखल घेवून महायुतीचे उमेदवार म्हणून राम सातपुते यांना माळशिरस मतदार संघातून उमेदवारी दिली आहे. सध्या राजकारणात घराणेशाही बरोबरच धनदांडग्या लोकांचीच अधिक गर्दी आहे. अशा गर्दीत देखील भाजपने एका ऊसतोड कामगाराच्या मुलाला आमदारकीचे तिकीट देईन वेगळा संदेश दिला आहे. भाजपच्य या निर्णयाचे सर्वत्र स्वागत केले जात आहे.

5 वर्षांच्या मुलीची छेड काढणाऱ्याला बेदम मारहाण, VIDEO VIRAL

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 6, 2019 08:59 PM IST

ताज्या बातम्या