अपक्ष उमेदवाराची जीभ घसरली; भाजप नेत्याच्या पत्नीबाबत केले आक्षेपार्ह वक्तव्य

राजेंद्र मिरगणे यांनी शिवसेना उमेदवार दिलीप सोपल यांना पाठिंबा दिल्याने राजा राऊत यांची टीका...

News18 Lokmat | Updated On: Oct 16, 2019 04:15 PM IST

अपक्ष उमेदवाराची जीभ घसरली; भाजप नेत्याच्या पत्नीबाबत केले आक्षेपार्ह वक्तव्य

सागर सुरवसे,(प्रतिनिधी)

सोलापूर,16 ऑक्टोबर: बार्शीचे माजी आमदार आणि अपक्ष उमेदवार राजा राऊत यांनी अतिशय खालच्या पातळीवर जाऊन टीका केल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. भाजपचे नेते आणि गृहनिर्माण मंडळाचे सहअध्यक्ष राजेंद्र मिरगणे यांच्यावर टीका करताना राजा राऊत यांनी चक्क त्यांच्या पत्नीबद्दल अपशब्द वापरल्याचे पाहायला मिळाले.

राजेंद्र मिरगणे हे टेंडरसाठी स्वतः च्या बायकोला विकणारी मिरगणेची ही औलाद, माझ्याबद्दल काय बोलतोय, अशी अत्यंत खालच्या शब्दांत टीका केली आहे. त्यामुळे बार्शी तालुक्यातून अपक्ष उमेदवार राजा राऊत यांच्याविरोधात निषेधाचा सूर पाहायला मिळत आहे. भाजप नेते आणि राज्यमंत्री दर्जाचे नेते राजेंद्र मिरगणे यांनी शिवसेना उमेदवार दिलीप सोपल यांना पाठिंबा दिल्याने राऊत यांनी वैयक्तिक टीका करायला सुरुवात केल्याचे सोपल गटाकडून सांगण्यात येत आहे.

दिलीप सोपल यांना भाजपमधून विरोध

​​​​​​दरम्यान, ​राष्ट्रवादीतून आलेल्या दिलीप सोपल यांना शिवसेनेने बार्शीतून उमेदवारी दिली आहे. भाजपचे नेते तथा मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय राजा राऊत यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. बार्शीत सोपलविरुद्ध राऊत अशीच लढत आहे. जो मतदारसंघ भाजपला सुटला तिथे शिवसैनिक तर जो मतदारसंघ शिवसेनेला सुटला तेथील भाजप कार्यकर्ते नाराज झाले. परिणामी आता दस्तुरखुद्द भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादांपासून ते अनेक उमेदवारांना बंडाळीला सामोरे जावे लागत आहे. सत्तेचा घास समोर असताना बंडाळीला कसे सामोरे जावे, असा प्रश्न महायुतीसमोर आहे.

Loading...

VIDEO: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उडवली काँग्रेस-राष्ट्रवादीची खिल्ली, म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 16, 2019 04:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...