प्रकाश आंबेडकर म्हणाले.. जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्यामागे 'हा' खटाटोप

प्रकाश आंबेडकर म्हणाले.. जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्यामागे 'हा' खटाटोप

माढा तालुक्यातील अरण येथे माळी समाजाच्या सत्तासंपादन मेळाव्यासाठी प्रकाश आंबेडकर आले होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकार आणि आरएसएसवर घणाघाती टीका केली.

  • Share this:

वीरेंद्रसिंह उत्पात,(प्रतिनिधी)

माढा, 16 सप्टेंबर: केंद्रातील भाजप सरकारकडून जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्याचा डांगोरा पिटला जात असला तरी वस्तुस्थिती वेगळीच आहे. जवळपास 33 हजार कुटुंब काश्मीर सोडून गेलेली आहेत. उद्योगपती आणि बिल्डरांना काश्मिरातील जागा विकण्यासाठी सरकारने हा खटाटोप केला आहे, असा घणाघाती आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

माढा तालुक्यातील अरण येथे माळी समाजाच्या सत्तासंपादन मेळाव्यासाठी प्रकाश आंबेडकर आले होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकार आणि आरएसएसवर घणाघाती टीका केली. जम्मू काश्मीरमधून 370 कलम रद्द केल्यानंतर तिथे लोकशाही नसून हुकूमशाही सुरू आहे. तेथील लोकांच्या जमिनी विकत घेण्याचा सरकारचा डाव आहे. सरकारच्या शंभर दिवसातले काम शून्य आहे.

आरएसएसला संविधानाप्रमाणे दिलेल्या आरक्षणाचा वावडं आहे. देशाचे संविधान बदलून लोकांचे आरक्षण बंद करून या देशांमध्ये पुन्हा पहिल्यासारखे परिस्थिती आरएसएसला निर्माण करायची आहे. त्यामुळे संविधान बदलण्याचा त्यांचा डाव आहे. भारत देशातील जनता ही लोकशाहीतील राजा आहे. तुमच्या मताचा जर तुम्ही योग्य वापर केला तर त्या देशात चांगले लोकसत्तेत बसू शकतील. बहुजन समाजातील सर्व जाती जमाती एकमेकांवर विश्वास ठेवला पाहिजे, तरंच या वंचित घटकांची सत्ता येईल आणि वंचित आपण जाऊन हा समाज सत्ताधारी बनेल, असेही आंबेडकर म्हणाले.

मुस्लिम मतांबाबत काय म्हणाले होते प्रकाश आंबेडकर

लोकसभा निवडणुकीत सोशल इंजिनिअरिंगचा नारा देत राजकारणात नवं पर्व सुरू करण्याची घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली होती. MIM सोबत युती करून दलित मुस्लिम ऐक्याची हाक त्यांनी दिली होती. लोकसभा निवडणुकीत 'वंचित'बहुजन आघाडीचा फटकाही काँग्रेस आणि राष्ट्रवादीला बसल्याचे स्पष्ट झाले. आता लोकसभा निवडणुकीनंतर चार महिन्यांनी प्रकाश आंबेडकर आणि MIM यांची फारकत झाली. लोकसभा निवडणुकीत आम्हाला मुस्लिम मतं मिळालीच नाहीत, असे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले काही दिवसांपूर्वी अमरावतीत केले होते. त्यामुळे MIM सोडून गेल्याने फारसं नुकसान होणार नाही असंही ते म्हणाले. प्रकाश आंबेडकर म्हणाले, MIM सोबत युती तुटली तरी त्याचा वंचित आघाडीवर परिणाम होणार नाही.

गेल्या निवडणुकीत मुस्लिम समाजाने वंचित आघाडीला मतदान केलं नव्हतं असं सांगत एमआयएम सोबत युती तुटल्याची थेट कबुली दिली. प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार असून तो एमआयएमलासुद्धा आहे असे सांगत एमआयएम ला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आहेत असंही ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीनंतर मुस्लिम समाजाचा आत्मविश्वास वाढल्याने तो समाज आमच्या सोबत आहे असंही त्यांनी सांगितलं.

विधानसभेच्या 25 जागांवर मुस्लिम समाजातील उमेदवार देणार अशी घोषणाही त्यांनी केली. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथे मातंग समाजाच्या वतीने सत्तासंपादन व प्रबोधन मेळाव्यासाठी ते आले होते. विरोधी पक्षातील नेते वंचित आघाडी सत्तेवर येणार या भीतीने भाजपात प्रवेश करत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

VIDEO: तरुणाचं मानसिक संतुलन बिघडलं, PUBGमुळे बडबडतो 'पुढं हेडशॉट मारतो मी'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 16, 2019 11:02 AM IST

ताज्या बातम्या