महाराष्ट्रात 'या' नेत्यासाठी पंतप्रधान मोदींची होणार पहिली सभा

पंतप्रधान मोदी यांच्याशीवाय अमित शहा, जेपी नड्डा, योगी आदित्यनाथ यांच्यासह भाजपचे दिग्गज नेते महाराष्ट्रात प्रचारासाठी उतरणार आहेत.

News18 Lokmat | Updated On: Oct 6, 2019 05:16 PM IST

महाराष्ट्रात 'या' नेत्यासाठी पंतप्रधान मोदींची होणार पहिली सभा

संदिप राजगोळकर, कोल्हापूर 06 ऑक्टोंबर : महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराची खरी रणधुमाळी आता सुरू होणार आहे. भाजपने(BJP) त्यासाठी खास योजना तयार केली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांच्यासह अनेक दिग्गज नेते राज्यात प्रचाराचा धुरळा उडवणार आहेत. भाजपचा हुकूमाचा एक्का असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेवटच्या टप्प्यात प्रचारात उतरणार असून साताऱ्यात होत असलेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले(Udayanraje Bhosale) यांच्यासाठी ते पहिली सभा घेणार आहेत. त्यानंतर राज्यात ते सलग तीन दिवस सभा घेण्याची शक्यता असून त्यामुळे प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात वातावरण ढवळून निघणार आहे. उदयनराजे भोसले यांनी काही आठवड्यांपूर्वी राष्ट्रवादीच्या(NCP) खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर विधानसभा निवडणुकीसोबतच सातारा(Stara) लोकसभेची पोटनिवडणुकही होतेय. या निवडणुकीकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलंय. त्यात आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिली सभा उदयनराजे यांच्यासाठी घेत असल्याने राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. राज्यात पंतप्रधान मोदींच्या 9 सभा होणार आहेत.

वाचा- भाजपचं टेन्शन वाढलं, बंडखोरी केलेल्या 114 उमेदवारांशी मुख्यमंत्र्यांचा संपर्क

महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचाराची एक फेरी पूर्ण केलीय. त्याला उत्तम प्रतिसादही मिळाला असा दावा भाजपने केलाय. आता खरी लढाई सुरू होणार असून भाजपने प्रचाराचा 'मेगा प्लान' तयार केलाय. प्रचारात भाजपची कायम आघाडी असते. याही निवडणुकीत भाजप सर्वच साधनांचा वापर करणार असून प्रचारात भाजपचा हुकूमी एक्का असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांचा धडाका असणार आहे.

वाचा-   काँग्रेसला हवाय उर्मिला मातोंडकर यांचा 'हात', या कामासाठी घातलं साकडं

भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या 20 सभा होणार आहेत. राज्याच्या कुठल्या भागात या सभा घ्यायच्या याचं नियोजन भाजपचे ज्येष्ठ नेते करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या प्रचारातले स्टार प्रचारक असणार आहेत. डिजीटल आणि सोशल मीडियाचा अतिशय प्रभाविपणे वापर करण्याचं भाजपने नियोजन केलंय त्यामुळे प्रचार जोरदार रंगण्याची शक्यता आहे.

Loading...

मुख्यमंत्री घेणार राज्यात तब्बल 100 सभा

विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याही सभांचा धडाका असणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस जवळपास 100 सभा घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील संयुक्त सभेने होणार प्रचाराची सांगता होणार आहे. राज्यात भाजपच्या प्रचारासाठी देशभरातून नेते मंडळीही येणार आहेत. यात जे पी नड्डा, स्मृती इराणी, योगी आदित्यनाथ, गौतम गंभीर, प्रकाश जावडेकर, राजवर्धन राठोड या नेत्यांचा समावेश असणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 6, 2019 05:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...