'24 तारखेला रात्रीच्या 12 वाजून 12 मिनिटांनी राष्ट्रवादीचे घड्याळ कायमचे बंद पडणार'

'24 तारखेला रात्रीच्या 12 वाजून 12 मिनिटांनी राष्ट्रवादीचे घड्याळ कायमचे बंद पडणार'

राष्ट्रवादीचा सर्वात मोठा शत्रू कुणी असेल ते गोपीनाथ मुंडे आणि त्यांची अवलात म्हणजे मी.

  • Share this:

साहेबराव कोकणे,(प्रतिनिधी)

अहमदनगर,12 ऑक्टोबर: राष्ट्रवादीचा सर्वात मोठा शत्रू कुणी असेल ते गोपीनाथ मुंडे आणि त्यांची अवलात म्हणजे मी. त्यामुळे राज्यात येत्या 24 तारखेला रात्रीच्या 12 वाजून 12 मिनिटांनी राष्ट्रवादीचे घड्याळ कायमचे बंद पडणार आहे. 370 हा आमच्या प्रचाराचा नव्हे तर आमच्या स्वाभिमानाचा व संस्काराचा मुद्दा आहे, असे मत  राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.

नगरचे पाणी बीडला पळविणार, या अफवेचा त्यांनी समाचार घेतला. राहुरी विधानसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार शिवाजी कर्डिले, नेवासा मतदारसंघातील उमेदवार बाळासाहेब मुरकुटे, शेवगाव-पाथर्डीच्या उमेदवार मोनिका राजळे यांच्या प्रचारार्थ पांढरीपूल येथे जाहीर झाली. सभेत भाजप नेत्या पंकजा मुंडे बोलत होत्या. बीडमध्ये जाणार अशी अफवा सध्या जोरात सुरू आहे. आम्ही पाणी पळवणारे नाही तर पाणी पाजणारे आहोत. यामुळे अशा अफवांवर विश्वास ठेऊ नका. आमच्याकडे कर्डिले, मुरकुटे यांच्यासारखे टोपीवाले आमदार आहेत. यामुळे राष्ट्रवादीवाल्यांनी आता लोकांना टोपी घालण्याचे उद्योग बंद करावेत. राज्याच्या निवडणुकीत देशाच्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार आहे. राज्यात पुन्हा महायुतीची एक हाती सत्ता येणार आहे. आम्ही एक एक आमदार विजयी व्हावा यासाठी स्वत:चे मतदारसंघ सोडून राज्यभर फिरत आहोत. युती सरकारने मराठा आरक्षणाबरोबरच धनगर समाजाला न्याय देण्याचा निर्णय घेतला. जातीपातीचे राजकारण न करता समाजातील प्रत्येक घटकांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचे काम स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या प्रेरणेने सुरू आहे.

VIDEO:PMC चे खातेदार 'राज'दरबारी, बैठकीबाबत शर्मिला ठाकरे म्हणाल्या...

Published by: Sandip Parolekar
First published: October 12, 2019, 10:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading