निवडणूक खर्चात तफावत, बार्शीत या सहा उमेदवारांना बजावली नोटीस

निवडणूक खर्चात तफावत, बार्शीत या सहा उमेदवारांना बजावली नोटीस

उमेदवारांना नोटीस मिळालेनंतर 48 तासांत खुलासा करण्याचे निर्देश...

  • Share this:

सागर सुरवसे,(प्रतिनिधी)

सोलापूर,16 ऑक्टोबर:बार्शी विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची दुसरी तपासणी बुधवारी खर्च निरिक्षक राघवेंद्र पी. यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयात करण्यात आली. या तपासणीवेळी अनुपस्थित असलेबाबत राजकीय पक्षांचे कनिष्क सुरेश शिंदे, नागनाथ अभिमानु चावण या उमेदवारांना नोटीस बजावण्यात आली.

अॅड. दिलीप सोपल (राजकीय पक्ष), राजेंद्र राऊत (अपक्ष), भुमकर निरंजन प्रकाश ( राजकीय पक्ष) यांना निवडणूक खर्चामध्ये तफावत आढळून आल्याने त्यांना नोटीस देण्यात आली. याचवेळी जगन्नाथ निवृत्ती मुंडे या उमेदवारांना निवडणूक खर्च बँकेमार्फत करण्यात आलेला नसलेने त्यांना नोटीस देण्यात आली आहे. या सर्व उमेदवारांना नोटीस मिळालेनंतर 48 तासांत खुलासा करण्याविषयी खर्च निरिक्षक यांनी निर्देशित केले आहे, असे निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम पाटील यांनी कळवले आहे.

बार्शी विधानसभा मतदारसंघातील खर्च निरिक्षक राघवेंद्र पी. यांनी उमेदवारांच्या खर्चाची तपासणी करुन, खर्च तपासणी पथकातील सर्व सदस्य, उपस्थित उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांना निवडणूक खर्च सादर करण्याबाबत सूचना व मार्गदर्शन केले, असेही निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम पाटील यांनी सांगितले.

या अपक्ष उमेदवाराची जीभ घसरली...

बार्शीचे माजी आमदार आणि अपक्ष उमेदवार राजा राऊत यांनी अतिशय खालच्या पातळीवर जाऊन टीका केल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. भाजपचे नेते आणि गृहनिर्माण मंडळाचे सहअध्यक्ष राजेंद्र मिरगणे यांच्यावर टीका करताना राजा राऊत यांनी चक्क त्यांच्या पत्नीबद्दल अपशब्द वापरल्याचे पाहायला मिळाले. याप्रकरणी भादंवि 294, 509, 500, 506, 188 प्रमाणे राजा राऊत यांच्याविरूद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय म्हणाले होते राजा राऊत...

राजेंद्र मिरगणे हे, टेंडरसाठी स्वतःच्या बायकोला विकणारी मिरगणेची ही औलाद, माझ्याबद्दल काय बोलतोय अशी हीन शब्दात टीका केली आहे. त्यामुळे बार्शी तालुक्यातून अपक्ष उमेदवार राजा राऊत यांच्याविरोधात निषेधाचा सूर पाहायला मिळत आहे. भाजप नेते आणि राज्यमंत्री दर्जाचे नेते राजेंद्र मिरगणे यांनी शिवसेना उमेदवार दिलीप सोपल यांना पाठिंबा दिल्याने राऊत यांनी वैयक्तिक टीका करायला सुरुवात केल्याचे सोपल गटाकडून सांगण्यात येत आहे.

दिलीप सोपल यांना भाजपमधून विरोध

​​​​​​दरम्यान, ​राष्ट्रवादीतून आलेल्या दिलीप सोपल यांना शिवसेनेने बार्शीतून उमेदवारी दिली आहे. भाजपचे नेते तथा मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय राजा राऊत यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. बार्शीत सोपलविरुद्ध राऊत अशीच लढत आहे. जो मतदारसंघ भाजपला सुटला तिथे शिवसैनिक तर जो मतदारसंघ शिवसेनेला सुटला तेथील भाजप कार्यकर्ते नाराज झाले. परिणामी आता दस्तुरखुद्द भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादांपासून ते अनेक उमेदवारांना बंडाळीला सामोरे जावे लागत आहे. सत्तेचा घास समोर असताना बंडाळीला कसे सामोरे जावे, असा प्रश्न महायुतीसमोर आहे.

VIDEO: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उडवली काँग्रेस-राष्ट्रवादीची खिल्ली, म्हणाले...

First published: October 16, 2019, 9:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading