सांगलीत आर.आर.आबांच्या पत्नीला आव्हान देणार या केंद्रीय मंत्र्याची मिसेस

सांगलीत आर.आर.आबांच्या पत्नीला आव्हान देणार या केंद्रीय मंत्र्याची मिसेस

तासगाव-कवठे महांकाळ मतदारसंघ राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आणि माजी गृहमंत्री आर.आर. पाटील अर्थात आबांचा बालेकिल्ला आहे. आबा 2014 च्या निवडणुकीतही विजयी झाले.

  • Share this:

सांगली, 11 सप्टेंबर: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या पत्नी सीमा आठवले यांनी तासगाव- कवठे महांकाळमधून निवडणूक लढण्यास तयार आहोत, अशी घोषणा केली आहे. एवढेच नाही तर तासगावच्या सर्वांगीण विकासासाठी दिल्लीतून निधी खेचून आणू, अशी ग्वाही देखील सीमा आठवले यांनी दिली आहे. तासगाव येथे आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या.

दुष्काळी भागातील शेतकरी, शेतमजुरांचे व शेतीच्या पाण्याचा प्रश्न आगामी काळात पूर्णत्वास नेण्यासाठी लक्ष घालणार आहे. तसेच महिलांच्या विकासासाठी राज्य व केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना ग्रामीण भागात पोहोचवण्यासाठी रिपब्लिकन महिला आघाडीने प्रयत्न केले पाहिजेत, असा आदेशवजा सल्ला सीमा आठवले यांनी पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांना दिला.

तासगाव मतदारसंघ म्हणजे आबांचा बालेकिल्ला...

तासगाव-कवठे महांकाळ मतदारसंघ राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आणि माजी गृहमंत्री आर.आर. पाटील अर्थात आबांचा बालेकिल्ला आहे. आबा 2014 च्या निवडणुकीतही विजयी झाले. मात्र, त्यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. अन‌् पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी सुमन पाटील विजयी झाल्या. आताही राष्ट्रवादीकडून सुमन पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.

या दोघींत मुख्य लढत..

दरम्यान, पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे नेते संजयकाका पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करून 2014 मध्ये सांगलीची खासदारकी मिळवली. आता त्यांच्या पत्नी ज्योती पाटील यांनी तासगाव-कवठे महांकाळ मतदारसंघासाठी भाजपतर्फे तिकिटासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. लोकसभा निवडणुकीपासूनच त्यांनी मतदारांशी थेट संपर्क वाढवण्यावर भर दिला आहे. त्यामुळे ज्योती पाटील विरूद्ध सुमन पाटील अशी मुख्य लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, अचानक सीमा आठवले यांनी याच मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छा दर्शवल्याने आता तिरंगी लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

VIDEO:वंचितकडून जातीयवादी पक्षाला मदत, पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 11, 2019 11:40 AM IST

ताज्या बातम्या