खोटं वय दाखवून वयाच्या 17 व्या वर्षीच पंचायत समिती सदस्य बनला होता हा नेता!

खोटं वय दाखवून वयाच्या 17 व्या वर्षीच पंचायत समिती सदस्य बनला होता हा नेता!

आमदार पाटील यांना हे वक्तव्य सांगोल्यात शेकापच्या मेळाव्यात केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

  • Share this:

वीरेंद्रसिंग उत्पात,(प्रतिनिधी)

पंढरपूर, 15 सप्टेंबर: वयाच्या 14 व्या वर्षी राजकारणात आलो.. वय वाढवून वयाच्या 17 व्या वर्षी पंचायत समितीचा सदस्य झालो, असा गौप्यस्फोट खुद्द शेतकरी कामगार पक्षाचे (शेकाप) नेते आणि आमदार जयंत पाटील यांनी केला आहे. आमदार पाटील यांना हे वक्तव्य सांगोल्यात शेकापच्या मेळाव्यात केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सत्ता मिळवण्यासाठी राजकारणी नेते प्रशासकीय यंत्रणेला हाताशी धरून कसा दुरूपयोग करू शकतात, हे जळजळीत वास्तव या निमित्तने जगासमोर आले आहे.वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मतदान करण्याचा अधिकार मिळतो तर स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवण्यासाठी 21 वर्षे पूर्ण व्हावी लागतात, असे असताना शेकापचे नेते जयंत पाटील यांनी आपण वयाच्या 17 व्या वर्षीच पंचायत समितीचे सदस्य झाल्याचे कबूल केले आहे. भावनेच्या भरात केलेल्या या वक्तव्यामुळे आमदार पाटील अडचणीत येण्याची शक्यता आहे. मात्र, त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

यामुळे आले होते चर्चेत....

रायगड लोकसभा मतदारसंघात शेकापने पाठिंबा देऊनही राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा निसटता विजय झाला. तर मावळमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव झाला. यामुळे संतप्त झालेले शेकाप नेते आणि आमदार जयंत पाटील यांनी 'लोकसत्ता'चे अलिबागचे प्रतिनिधी हर्षद कशाळकर यांना मारहाण केली होती. या घटनेचा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने निषेध केला होता. शेकापची अडीच लाख मतं गेली कुठे, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. याबाबत विचारणा करताच संतापलेल्या जयंत पाटील यांनी पत्रकार हर्षद कशाळकर यांच्यावर भ्याड हल्ला केला. जयंत पाटील यांनी कशाळकर यांना मारहाण केली. हा सर्व प्रकार मतमोजणी केंद्रात पोलिसांसमोरच घडला. काय वाट्टेल त्या बातम्या छापता काय, असे म्हणत त्यांनी कशाळकर यांना मारहाण केली.

VIDEO: इंदापुरातून हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी? यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 15, 2019 10:16 AM IST

ताज्या बातम्या