Elec-widget

राजकारणातील भीष्म पितामहांचा 5 दशकांचा प्रवास थांबणार, दिला हा वारसदार

राजकारणातील भीष्म पितामहांचा 5 दशकांचा प्रवास थांबणार, दिला हा वारसदार

महाराष्ट्राच्या विधानसभेतील ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीस पूर्णविराम दिला आहे.

  • Share this:

वीरेंद्र उत्पात,(प्रतिनिधी)

सांगोला,29 सप्टेंबर: महाराष्ट्राच्या विधानसभेतील ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीस पूर्णविराम दिला आहे. विशेष म्हणजे त्यांनी आपला राजकीय वारसदारही दिला आहे. सांगोल्यातून शेतकरी कामगार पक्षाकडून भाऊसाहेब रूपनर निवडणूक लढवणार आहे. पक्षाच्या बैठकीत झाला निर्णय एक व्यक्ती एक पक्ष आणि एकच विधानसभा मतदारसंघ अशी ज्यांची ओळख आहे. शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख हे आता विधानसभा निवडणूक लढवणार नाहीत. तशी घोषणा त्यांनी एक महिन्यापूर्वी केली होती. आज सांगोल्यात शेतकरी कामगार पक्षाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाला.

शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस आमदार जयंत पाटील, आमदार गणपतराव देशमुख आणि पक्षाचे ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीत गणपतरावांच्या राजकीय वारसदाराची निवड करण्यात आली. सांगोला विधानसभा मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाचे नेते तथा उद्योजक भाऊसाहेब रूपनर यांना उमेदवारी जाहीर झाली.

गणपतराव देशमुख यांनी 1962 साली पहिली निवडणूक लढवली होती. 1972 आणि 1995 च्या  विधानसभा निवडणुकीचा पराभव वगळता तब्बल 11 वेळा सांगोला विधानसभा मतदारसंघातून येथील जनतेने त्यांना निवडून दिले आहे. सध्या गणपतराव देशमुख यांचे वय 93 वर्षे आहे. त्यांना वयोमानामुळे काम करणे अवघड होत आहे. 

शेतकरी कामगार पक्षाकडून पाच इच्छुक उमेदवार होते. या पाच उमेदवारामधून मेडशिंगी गावचे भाऊसाहेब रूपनर यांना पक्षाने उमेदवारी दिली. भाऊसाहेब रूपनर यांच्या तीन पिढ्यापासून कुटूंबात शेतकरी कामगार पक्षाचे काम आहे. रूपनर हे मोठे उद्योजक आहेत. सांगोल्यात एक सुतगिरणी आणि एक अभियांत्रिकी महाविद्यालय रूपनर यांच्या माध्यमातून सुरू आहे. शेतकरी कामगार पक्षाचा सांगोलचा गड आता रूपनर राखणार का? गणपतराव देशमुख यांच्या नंतर कार्यकर्ते रूपनर यांना स्विकारणार का? गणपतरावांचे पारंपारिक विरोधक शहाजी पाटील हे बाजी मारणार का? की राष्ट्रवादी काँग्रेसपासून दुरावलेले माजी आमदार दीपक साळुंखे यांना संधी मिळणार हे आता येणारी निवडणूक आणि इथले मतदारच ठरवतील.

Loading...

VIDEO: राष्ट्रावादीसोबत फॉर्म्युला ठरला; मित्रपक्षांसोबत अजूनही सस्पेन्स

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 29, 2019 09:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...