Elec-widget

'मेकअप' कीट भोवलं... अखेर या कॉंग्रेस आमदारासह तिघांवर सोलापुरात गुन्हा

'मेकअप' कीट भोवलं... अखेर या कॉंग्रेस आमदारासह तिघांवर सोलापुरात गुन्हा

आदर्श आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी अखेर कॉंग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • Share this:

सागर सुरवसे, (प्रतिनिधी)

सोलापूर,25 सप्टेंबर:आदर्श आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी अखेर कॉंग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाजी पेठेतील व्यंकटेश नगरात मेकअप कीट वाटप केल्याप्रकरणी जेलरोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरारी पथक क्रमांक 6 चे प्रमुख ईश्वर गिडवीर यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदार प्रणिती शिंदे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

प्रणिती शिंदे यांची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच त्यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. प्रणिती शिंदे यांनी मेकअप कीटचे वाटप केल्याने वाद निर्माण झाला होता. माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी आचारसंहिता भंगाची तक्रार केली होती. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी यासाठी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांना दिले होते.

आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर प्रणिती शिंदेंनी मतदारांना मेकअप कीट गिफ्ट म्हणून वाटले, असल्याची माहिती देण्यात आली होती. त्यामुळे त्यांनी आचारसंहितेचा भंग केला असल्याची तक्रार नरसय्या यांच्याकडून करण्यात आली आहे. आडम मास्तरांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे तक्रार केली होती.

निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली त्यानंतरच हे प्रकरण उघडकीस आले होते. दोन्ही राज्यांमध्ये एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. दोन्ही राज्यांत 21 ऑक्टोबरला मतदान होणार असून 24 ऑक्टोबर रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर केले जाणार आहेत. यासोबतच आयोगानं 64 जागांवर पोटनिवडणुकांसाठीही सूचना जारी केल्या आहेत.

Loading...

या दरम्यान, निवडणूक आयोगानं पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका आणि पोटनिवडणुकांसाठी प्लास्टिकच्या वापर टाळण्याचे आदेश दिले आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी प्लास्टिक वापरासंदर्भात विशेष निर्देश जारी केले आहेत. राजकीय पक्षांनी प्रचारादरम्यान पर्यावरणपूरक साहित्यांचा वापर करावा, असे आवाहन सुनील अरोरा यांनी केले आहे.

VIDEO: पवारांवरील कारवाईनंतर बारामीतकरांमध्ये रोष, रस्त्यावर उतरून केली निदर्शनं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 25, 2019 02:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...