डॉ.सुजय विखे पाटलांच्या 'त्या' वक्तव्याचा निषेध, शेतकरी मुलांनी पाठवला 2 हजारांचा चेक

'पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेले 2 हजार रुपये शेतकऱ्यांना चालतात, मग भाजपचं कमळ का नको', खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या या वक्तव्याचा सर्वच स्तरांतून निषेध होत आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 7, 2019 06:27 PM IST

डॉ.सुजय विखे पाटलांच्या 'त्या' वक्तव्याचा निषेध, शेतकरी मुलांनी पाठवला 2 हजारांचा चेक

अहमदनगर,7 ऑक्टोबर:'पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेले 2 हजार रुपये शेतकऱ्यांना चालतात, मग भाजपचं कमळ का नको', खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या या वक्तव्याचा सर्वच स्तरांतून निषेध होत आहे. नगरमधील शेतकऱ्यांच्या संतप्त मुलांनी सुजय विखे यांना निवेदनासह 2 हजार रुपयांचा चेक स्पीड पोस्टाने पाठवला आहे. 'आम्ही सुजय विखेंना दोन हजार रुपये पाठवत आहोत. त्यांनी लोणीमध्ये कमळ सोडून अन्य कुणालाही मत द्यावे, असे आवाहनही त्यांना या निवेदनातून करण्यात आले आहे.

काय म्हणाले होते खासदार सुजय विखे..?

कर्जत-जामखेड मतदारसंघातील भाजपचे उमेदवार पालकमंत्री राम शिंदे यांच्या प्रचारसभेत शुक्रवारी खासदार सुजय यांनी शेतकऱ्यांचा अपमान करणारे वक्तव्य केले होते. 'पालकमंत्र्यांनी विरोधी उमेदवाराच्या सभेला जाणाऱ्या लोकांची यादी काढावी. त्या सभेला जाणाऱ्या अनेकांच्या खात्यात मागील महिन्यात मोदींनी दोन हजार रुपये जमा केले आहेत. मोदींचे हे दोन हजार रुपये चालतात, मग त्यांचे कमळ का नको?, तुम्हाला कम‌ळ चालत नसेल तर ते पैसे परत करा, आम्हाला गरीबांच्या कल्याणासाठी तरी वापरता येतील,' असे वक्तव्य खासदार सुजय विखे यांनी केले होते.

भाजपला मतदान करू नका...

Loading...

दोन हजारांत आपली किंमत करू पाहणारे सुजय यांचे वडील राधाकृष्ण विखे-पाटील. ज्यांच्यासाठी नैतिकता बाजूला ठेवून सुजय मतांचा जोगवा मागत आहेत. त्या राम शिंदे व त्यांच्या पक्षाला, म्हणजेच भाजपला मतदान करू नका, असे आवाहनही संतप्त तरुणांनी शेतकऱ्यांना केले आहे.

VIDEO :..आणि चंद्रकांत पाटलांच्या चेहऱ्यावर हसू उमटले, मेधा कुलकर्णींबद्दल केला मोठा खुलासा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 7, 2019 06:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...