भाजप ना सेना... या ज्येष्ठ नेत्याचा मुलगा 'क्रांतिकारी'च्या माध्यमातून लढणार अपक्ष

भाजप ना सेना... या ज्येष्ठ नेत्याचा मुलगा 'क्रांतिकारी'च्या माध्यमातून लढणार अपक्ष

शरद पवारांचे निकटवर्तीय असणारे ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचे पुत्र आणि माजी आमदार शंकरराव गडाख यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.

  • Share this:

हरीष दिमोटे,(प्रतिनिधी)

अहमदनगर, 12 सप्टेंबर: शरद पवारांचे निकटवर्तीय असणारे ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचे पुत्र आणि माजी आमदार शंकरराव गडाख यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. शंकरराव गडाख भाजपत प्रवेश करणार की शिवसेनेचे बंधन बांधणार या चर्चांना आता पूर्णविराम मिळाली आहे. क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या माध्यमातून आपण अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे खुद्द शंकरराव गडाख यांनी कार्यकर्ता मेळाव्यात सांगितले आहे.

सध्या भाजप आणि सेनेत जोरदार इनकमिंग सुरू आहे. अहमदनगर जिल्ह्यातील विखेंसारखे दिग्गज नेतेही भाजपत दाखल झालेत. शरद पवारांचे निकटवर्तीय असणारे यशवंतराव गडाख मात्र गेल्या काही दिवसांपासून सर्व पक्षांपासून दूर आहेत. गेल्या निवडणुकीत शंकरराव गडाख यांनी राष्ट्रवादीच्या घड्याळावर निवडणूक लढवली होती. मात्र, केवळ चार हजार मतांनी त्यांचा पराभव झाला होता. राष्ट्रवादीतील अंतर्गत राजकारणामुळे आपण पराभूत झाल्याची गडाखांची धारणा झाल्याने त्यांनी अडीच वर्षापूर्वी राष्ट्रवादीतून बाहेर पडत क्रांतिकारी शेतकरी पक्ष स्थापन केला. नेवासा पंचायत समितीमध्ये सत्ता मिळवली. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेत क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे पाच सदस्य आहेत. या विधानसभेत गडाख भाजपात प्रवेश करणार, अशी जोरदार चर्चा सुरू होती. मात्र, सोनई येथे हजारो कार्यकर्त्यांच्या झालेल्या या मेळाव्यात आपण कोणत्याही पक्षात जाणार नसून क्रांतीकारी शेतकरी पक्षाच्या माध्यमातून अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची घोषणा शंकरराव गडाख यांनी केली आहे.

विखे पाटील यांचे निकटवर्तीय असणारे तात्कालीन कॉंग्रेसचे तालूकाअध्यक्ष बाळासाहेब मुरकुटे यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपत प्रवेश केला. शंकरराव गडाख यांच्या समोर आव्हान उभे केले होते. गडाख विरोधकांची साथ आणि मोदी लाटेत मुरकुटे यांनी गडाखांचा पराभव केला होता. आता पुन्हा एकदा या दोघांतच मुख्य लढत होण्याची चिन्हे असून राष्ट्रवादीकडून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांचे नाव चर्चेत आहे. आपल्यालाच भाजपाची उमेदवारी मिळणार असा दावा सचिन देसर्डा यांनी केला आहे. मात्र अजूनही चित्र स्पष्ट नसले तरी गडाखांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून कार्यकर्ते कामाला लागले आहेत. यावेळी मतदारसंघातील सर्व मतदारांना विश्वासात घेऊन शंकरराव गडाख पुन्हा आमदार होणार का? हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

SPECIAL REPORT:समस्या दूर करा नाहीतर मुख्यमंत्र्यांचं श्राद्ध घालू, विठुरायाच्या नगरीत विद्यार्थ्यांचा टाहो!

Published by: Sandip Parolekar
First published: September 12, 2019, 9:49 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading