अनामत रक्कम आणली कॅरी बॅगमध्ये, उमेदवाराला भरावा लागला 5 हजारांचा दंड

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अनामत रक्कम प्लॅस्टिक पिशवीत कॅरी बॅगमध्ये आणल्याने एका उमेदवाराला पाच हजार रूपयांचा दंड भरावा लागला आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 30, 2019 09:41 PM IST

अनामत रक्कम आणली कॅरी बॅगमध्ये, उमेदवाराला भरावा लागला 5 हजारांचा दंड

अहमदनगर,30 सप्टेंबर:विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अनामत रक्कम प्लॅस्टिक पिशवीत कॅरी बॅगमध्ये आणल्याने एका उमेदवाराला पाच हजार रूपयांचा दंड भरावा लागला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथे ही घटना घडली आहे.

नेवासा तालुक्यातील देवगाव येथील मच्छिंद्र देवराव मुंगसे असे कारवाई झालेल्या अपक्ष उमेदवाराचे नाव आहे. विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू होताच प्लॅस्टिक बाळगल्याने नेवासा नगरपंचायतीने ही कारवाई केली आहे. देवगाव येथील मुंगसे यांनी अनामत रक्कम भरण्यासाठी दहा हजारांची चिल्लर आणली होती. त्यामध्ये पाचशे रूपयांचे वीस बंडल प्लॉस्टिक पॅकेटमध्ये आणले होते. प्लॉस्टिक बंदी असताना सदरची रक्कम ही प्लॉस्टिकमध्ये आणल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी शाहूराज मोरे आणि नगरपंचायतचे मुख्याधिकारी तसेच सहाय्यक निवडणूक अधिकारी समीर शेख यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी मुंगसे यांना पाच हजाराचा दंड ठोठावला. यावेळी दंड भरताना एक हजारांची चिल्लरसह पाच हजार रुपये भरून दंडाची पावती आणि उमेदवारी अर्ज भरताना एक हजाराच्या चिल्लरसह दहा हजारांची अनामत रक्कम मुंगशे यांना भरावी लागली.

नेवासा येथे नगरपंचायत आहे. नगरपंचायत असूनही येथे प्लॉस्टिकविरोधी फारसी कारवाई झालेली नाही. मात्र, आजच्या या कारवाईने सगळ्याचे लक्ष वेधून घेतले आहे.

…तर खासदारकीचा राजीनामा देईल, सुजय विखे पाटलांच्या वक्तव्याने खळबळ

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असताना भाजपचे अहमदनगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे. डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्यामध्ये भाजपचे खासदार सुजय विखे यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. यावर प्रतित्युत्तर देतांना …तर खासदारकीचा राजीनामा देईल, असे सुजय विखे यांनी म्हटले आहे. खासदार सुजय विखे हे डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे संचालक आहेत.

Loading...

एक रुपयाचा भ्रष्टाचार दाखवून द्यावा..

डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या 64 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना खासदार सुजय विखे पाटील यांनी विरोधकांवर निशाणा साधला. खासदार विखे यांनी सांगितले की, राहुरीच्या ऊस उत्पादक सभासदांनी मोठ्या विश्वासाने साखर कारखाना आमच्याकडे दिला आहे. गेली दोन वर्षे हा साखर कारखाना चालवत असताना कुणी एक रुपयाचा देखील भ्रष्टाचार दाखवून दिल्यास आपण संचालक पदासह खासदारकीचा देखील राजीनामा देईल. माझे अंदाज खरे ठरतात. मी केंद्रात मंत्री झालो तर आश्चर्य वाटू देऊ नका, असेही सुजय विखे यांनी यावेळी म्हटले आहे. सुजय विखेंच्या या वक्तव्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार का? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

VIDEO:आदित्य ठाकरेंच्या घोषणेनंतर संजय राऊत म्हणतात, 'मुख्यमंत्री होणार तर...'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 30, 2019 09:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...