विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजताच बाळासाहेब थोरातांनी केला हा दावा

विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजताच बाळासाहेब थोरातांनी केला हा दावा

  • Share this:

हरिश दिमोटे,(प्रतिनिधी)

शिर्डी,21 सप्टेंबर:राज्यात निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. सगळे पक्ष निवडणुकीसाठी सज्ज झाले असून कॉंग्रेस आर्थिक मंदी, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहे. राज्यातील अनेक नेते संपर्कात असून लवकरच त्यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश होईल, असा दावाही कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे विविध पक्ष कामाला लागले आहेत. बाळासाहेब थोरात यांनी कॉग्रेस निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे सांगितले आहे. निवडणुकीत आर्थिक मंदी, बेरोजगारी सह शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन मैदानात उतरणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

शिवसेनेला लगावला टोला..

कॉंग्रेसची पहिली यादी लवकरच जाहीर करणार असून राज्यातील अनेक नेते काँग्रेसच्या संपर्कात आहेत. उमेदवारीसाठी अनेक जण काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असा दावाही थोरातांनी केला आहे. युती झाली किंवा नाही झाली तरी आम्ही लढायला तयार असे म्हणणारी शिवसेना बॅकफुटला जाताना दिसते आहे. हे लक्षण चांगल नाही, असा टोलाही थोरातांनी शिवसेनेला लगावला आहे.

असा आहे विधानसभा निवडणूक कार्यक्रम..

- अर्ज भरण्याची तारीख : 27 सप्टेंबर

- अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 4 ऑक्टोबर

- अर्ज छाननी : 5 ऑक्टोबर

- अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख : 7 ऑक्टोबर

- मतदानाची तारीख : 21 ऑक्टोबर

- निकाल : 24 ऑक्टोबर

असे आहे 2014 मधील पक्षीय बलाबल..

- भाजप - 122 जागा

- शिवसेना - 63 जागा

- काँग्रेस - 42 जागा

- राष्ट्रवादी काँग्रेस - 41 जागा

- इतर - 20 जागा

- एकूण - 288 जागा

VIDEO:निवडणुकीच्या तारखा जाहीर, मुख्यमंत्र्यांनी केलं 'हे' आवाहन

Published by: Sandip Parolekar
First published: September 21, 2019, 5:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading