राधाकृष्ण विखे पाटलांचा अर्ज वैध.. कॉंग्रेसच्या या उमेदवाराने घेतली होती हरकत

विखेंनी ज्याच्याकडे प्रतिज्ञापत्र केले आहे. त्या वकीलाला प्रतिज्ञापत्र करण्याचा अधिकार नसल्याचा दावा विरोधकांनी केला होता.

News18 Lokmat | Updated On: Oct 5, 2019 07:43 PM IST

राधाकृष्ण विखे पाटलांचा अर्ज वैध.. कॉंग्रेसच्या या उमेदवाराने घेतली होती हरकत

हरिश दिमोटे,(प्रतिनिधी)

शिर्डी,5 ऑक्टोबर: निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी भाजपचे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरवला आहे. कॉंग्रेसचे उमेदवार सुरेश थोरात यांनी विखे पाटील यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेतली होती. या

हरकतीवर झालेल्या सुनावणीत विखेंचा अर्ज वैध ठरवल्याचा निर्णय शिर्डी विधानसभा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिला आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उमेदवारी अर्जावर कॉंग्रेसचे उमेदवार सुरेश थोरात यांनी आक्षेप घेतला होता. विखेंनी ज्याच्याकडे प्रतिज्ञापत्र केले आहे. त्या वकीलाला प्रतिज्ञापत्र करण्याचा अधिकार नसल्याचा दावा विरोधकांनी केला होता. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केलेल्या लेखी तक्रारीवर शनिवारी तीन वाजता सुनावणी झाली. त्यानंतर विखेंचा उमेदवारी अर्ज वैध ठरवण्यात आला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यात त्यांनी स्वतः आणि आपल्या प्रतिनिधी करवे तीन असे एकूण चार उमेदवारी अर्ज दाखल केले. मात्र, हे अर्ज दाखल करताना नोटरी करून दिलेल्या प्रमाणपत्रावर कॉंग्रेसचे उमेदवार सुरेश थोरात यांनी हरकत घेतली आहे. ज्या वकिलाकडे हे प्रमाणपत्र बनवण्यात आले त्यांचा नोटरी करण्याचा परवाना 2016 साली संपला असल्याचा दावा विरोधकांनी केला होता. याबाबत लेखी तक्रार शिर्डी विधानसभा निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली होती.

Loading...

विखेविरुद्ध थोरात अशी चुरशीची लढत..

शिर्डीतून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे चुलत बंधू सुरेश थोरात यांना तिकीट देण्यात आले आहे. याआधी शिर्डी मतदारसंघात भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे इथं विखेविरुद्ध थोरात अशी चुरशीची लढत होणार आहे.

शिर्डी विधानसभेसाठी काँग्रेसकडून याआधी डॉ. सुधीर तांबे, डॉ. एकनाथ गोंदकर यांच्या नावांची चर्चा होती. मात्र आता सुरेश थोरात यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. स्वत: बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत सुरेश थोरात यांनी अर्ज दाखल केला आहे. सुरेश थोरात पंचायत समीतीचे सदस्य राहिले आहेत तर त्यांच्या पत्नी जि.प सदस्या होत्या. सुरेश थोरात हे जोरवे गावचे रहिवाशी असून बाळासाहेब थोरात यांच्या स्थानिक राजकारणात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे शिर्डीत विखेविरुद्ध थोरात असा रंगतदार सामना पाहायला मिळणार आहे.

...अन् अजित पवारांनी जिवंत माणसालाच वाहिली श्रद्धांजली, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 5, 2019 06:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...