सांगलीत काँग्रेसला हादरा...शरद पवारांवर टीका करत या नेत्याने दिली सोडचिठ्ठी

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करत देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 16, 2019 11:12 AM IST

सांगलीत काँग्रेसला हादरा...शरद पवारांवर टीका करत या नेत्याने दिली सोडचिठ्ठी

संदीप राजगोळकर,(प्रतिनिधी)

सांगली, 16 सप्टेंबर: विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना सांगलीत काँग्रेसला हादरा बसला आहे. सांगली जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आणि विधानपरिषदेचे माजी सभापती, काॅग्रेसचे दिवंगत नेते शिवाजीराव देशमुख यांचे पुत्र सत्यजित देशमुख यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सत्यजित देशमुख यांनी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. आता ते सांगली जिल्ह्यातील शिराळा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छूक आहेत.सत्यजित देशमुख आज महाजनादेश यात्रेदरम्यान कराडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

शरद पवार यांच्यावर जोरदार टीका..

सत्यजीत देशमुख यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देताना राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. स्वार्थावर उभा राहिलेल्या राष्ट्रवादीची शकलं उडायली लागली आहेत. शरद पवारांनी शिवाजीराव देशमुख साहेबांवर अन्याय केला. सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी पवारांनी नेहमी प्रयत्न केले, अशा शब्दात सत्यजीत देशमुख यांनी पवारांवर प्रहार केला आहे. दरम्यान,

आघाडीत शिराळा मतदार संघ काँग्रेसला मिळण्याची शक्यता धूसर असल्याने सत्यजित देशमुख हे मागील काही दिवसांपासून दुसऱ्या पर्यायाच्या शोधात होते. सत्यजित देशमुख यांनी शिराळा येथे कार्यकर्त्यांचा विशेष जनसंवाद मेळावा घेतला. त्यात त्यांनी आपला भाजप प्रवेशाचा निर्णय जाहीर केला. दरम्यान, विधानसभा निवडणूक तोंडावर सत्यजीत देशमुख यांनी काँग्रेसला रामराम ठोकल्याने राजकारणात मोठा भूकंप आला आहे.

Loading...

बंगल्यात घुसून बिबट्यानं केली कुत्र्याची शिकार; पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 16, 2019 09:16 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...