Elec-widget

बाळासाहेब थोरातांच्या विरोधात शिवसेनेच्या या नेत्याने दाखल केला अर्ज

बाळासाहेब थोरातांच्या विरोधात शिवसेनेच्या या नेत्याने दाखल केला अर्ज

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात शिवसेना-भाजप महायुतीचे साहेबराव नवले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

  • Share this:

हरिष दिमोटे,(प्रतिनिधी)

शिर्डी, 4 ऑक्टोबर: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात शिवसेना-भाजप महायुतीचे साहेबराव नवले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत शक्तीप्रदर्शन करीत नवले यांनी आपला अर्ज संगमनेर विधानसभा मतदार संघात दाखल केला.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात महायुतीचे साहेबराव नवले यांना शिवसेनेची उमेदवारी मिळाली असून शुक्रवारी जोरदार शक्तीप्रदर्शन करत नवले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थिती दाखवत थोरात यांच्या विरोधात लढाईला आपण सज्ज असल्याच दाखवून दिले. उद्योजक असलेले साहेबराव नवले यांच शहरात कृषी सेवा केंद्र असून नवले दूध या नावाने दूध संघ सुरू आहे. या शिवाय तालुक्यातील मालदाड गावात शिक्षण संस्था आहे.. बाळासाहेब थोरात यावेळी 8 व्या वेळी निवडणुकीला सामोरे जात असून नवले यांच्या पाठीशी विखे यंत्रणा उभी राहिल्याने निवडणूक रंगतदार होईल, अशी चर्चा सुरू झाली आहे.

शिर्डीत विखेंना भिडणार थोरात..

काँग्रेसने शिर्डी विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे. शिर्डीतून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे चुलत बंधू सुरेश थोरात यांना तिकीट देण्यात आले आहे. याआधी शिर्डी मतदारसंघात भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे इथं विखे विरुद्ध थोरात अशी चुरशीची लढाई रंगणार आहे.

Loading...

शिर्डी विधानसभेसाठी काँग्रेसकडून याआधी डॉ. सुधीर तांबे, डॉ. एकनाथ गोंदकर यांच्या नावांची चर्चा होती. मात्र आता सुरेश थोरात यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. स्वत: बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत सुरेश थोरात यांनी अर्ज दाखल केला आहे. सुरेश थोरात पंचायत समीतीचे सदस्य राहिले आहेत तर त्यांच्या पत्नी जि.प सदस्या होत्या. सुरेश थोरात हे जोरवे गावचे रहिवाशी असून बाळासाहेब थोरात यांच्या स्थानिक राजकारणात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे शिर्डीत विखे विरुद्ध थोरात असा रंगतदार सामना पाहायला मिळणार आहे.

नगरमध्ये थोरातविरुद्ध विखे संघर्ष

विधानसभा निवडणुकीआधी नगर जिल्ह्यातील ताकदवार नेते अशी ओळख असलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजकीय मुत्सद्देगिरी दाखवत थोरातांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता. कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी असणाऱ्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना घरच्या मैदानावर पराभूत करण्यासाठी विखेंनी प्रयत्न सुरू केले. राधाकृष्ण विखे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी बाळासाहेब थोरातांचे आणि राजकीय गुरू असलेल्या बाळासाहेब वाघ यांची घरी जाऊन भेट घेतली होतं. तसंच यावेळी विखेंनी नतमस्तक होऊन बाळासाहेब वाघ यांचे आशीर्वाद घेतले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत थोरातांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी विखे आपली सर्व शक्ती पणाला लावणार असल्याचे स्पष्ट झाले.

राधाकृष्ण विखेंनी ही खेळी खेळल्यानंतर आता बाळासाहेब थोरातांनी पलटवार केला आहे. थोरातांनी आपल्या कुटुंबातील व्यक्तीलाच विखेंविरोधात मैदानात उतरवलं आहे.

काँग्रेसमध्ये असतानाही या दोघांचे राजकीय युद्ध सुरू असल्याचं अनेकदा बघायला मिळालं. मात्र आता विखेंच्या भाजपप्रवेशानंतर हे युद्ध आणखी तीव्र झालं आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत कोण कुणाला शह देणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

बाळासाहेबांना 'ते' वचन दिलं होतं, त्याचं काय? उद्धव ठाकरे म्हणतात...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 4, 2019 09:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...