धमक्या देऊन राजकारण करायचे दिवस संपलेत, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

धमक्या देऊन राजकारण करायचे दिवस संपलेत, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

धमक्या देऊन राजकारण करायचे दिवस आता संपलेत.. आमच्यात धमक आहे. धमक्या देऊ नका, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचा समाचार घेतला आहे.

  • Share this:

हरीष दिमोटे,(प्रतिनिधी)

अहमदनगर,11 ऑक्टोबर: धमक्या देऊन राजकारण करायचे दिवस आता संपलेत.. आमच्यात धमक आहे. धमक्या देऊ नका, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचा समाचार घेतला आहे. शुक्रवारी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथे बाळासाहेब मुरकुटे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांनी सभा घेतली.

खोट बोल पण रेटून बोल, अशी आघाडीची अवस्था झाली आहे. पण खोटं बोलून मतं मिळत नसतात. त्यासाठी काम करावं लागतं, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आघाडीच्या नेत्यावर टीका केली. गेल्या पाच वर्षांत सातत्याने राज्यातील शेतकरी आणी जनतेच्या पाठीशी उभं राहण्याचं काम आम्ही केल्याचं मुख्यमंत्री म्हणले.

साखर कारखानदारी काढायची काय कुणाची मक्तेदारी नाही आहे. साखर कारखाने आम्हीही काढू शकतो त्यामुळे धमक्या देऊ नका. आता धमक्यांचं राजकारण संपलय, आम्हाला धमक्या द्यायच्या नाही. आमच्यात धमक आहे, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी नेवासा येथील विरोधी उमेदवार शंकरराव गडाख आणी विरोधकांवर शरसंधान साधले. लोकशाहीत धमक्या देऊन नाही तर प्रेमाने मत मिळत असतात असंही मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज, शुक्रवारी अहमदनगर जिल्ह्यात कोपरगाव, नेवासा, कर्जत आणी सिद्धटेक या ठिकाणी झंझावाती प्रचार सभा घेऊन विरोधकांवर शरसंधान साधले. त्यांनी घेतलेल्या या सभांमुळे आता मतदार काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

VIRAL VIDEO:धडधडत येणाऱ्या ट्रेनखाली आपणहून सरपटत गेला साप

Published by: Sandip Parolekar
First published: October 11, 2019, 5:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading