ताजमहाल सोडून सर्व काही देऊ विरोधकांच्या जाहीरनाम्याची मुख्यमंत्र्यांकडून खिल्ली

ताजमहाल सोडून सर्व काही देऊ विरोधकांच्या जाहीरनाम्याची मुख्यमंत्र्यांकडून खिल्ली

एकीकडे सांगली, कोल्हापूर येथे महापूर आहे तर दुसरीकडे मंगळवेढा सांगोला येथे थेंबभर पाणी नाही...

  • Share this:

वीरेंद्रसिंह उत्पात,(प्रतिनिधी)

पंढरपूर,10 ऑक्टोबर: विरोधकांना माहीत आहे ते निवडून येणार नाहीत. म्हणून त्यांनी प्रत्येकाला एक ताजमहाल देतो, असे सोडून सर्व आश्वासने दिली आहेत. अशा शब्दांत विरोधीपक्षाच्या जाहीर नाम्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खिल्ली उडवली आहे. सुशीलकुमार शिंदे दृष्ट्ये नेते आहेत.त्यांना माहीत आहे. राज्यात विरोधीपक्ष नेता ही पक्षाला मिळणार नाही. म्हणून सुशीलकुमार शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसमध्ये विलीन होईल, असे वक्तव्य केले. राज्यात विरोधी पक्ष कोठे शिल्लक राहिला आहे. मंगळवेढा येथे महायुतीच्या उमेदवारीचे उमेदवार सुधाकरपंत परिचारक यांचे प्रचारार्थ मुख्यमंत्री बोलत होते.

एकीकडे सांगली, कोल्हापूर येथे महापूर आहे तर दुसरीकडे मंगळवेढा सांगोला येथे थेंबभर पाणी नाही. ही दरी मिटवण्यासाठी वर्ल्डबँकच्या सहकार्याने कॅनलच्या माध्यमातून पाणी आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच नीरा भीमा योजना ही लवकरच पूर्ण होईल. महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी महायुतीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्यावे, अशी भावनिक साद त्यांनी यावेळी मतदारांना घातली.

मी थकलो नाही, शिंदेंपेक्षा मला अधिक समजते...

दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादी आज वेगळे असले तरी उद्या पुन्हा एकत्र येण्याचा विचार करतील, असे सांकेतिक वक्तव्य काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापुरात केले होते. त्यावरून दोन्ही काँग्रेस विलीनीकरणाची चर्चाही सुरू झाली होती. मात्र, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी त्याचे खंडन केले.

जळगावात पत्रकारांनी याबाबत प्रश्न विचारला असता पवार म्हणाले, 'शिंदे यांच्यापेक्षा राष्ट्रवादी मला अधिक कळते. शिंदे त्यांच्या पक्षाविषयी बोलले असतील. मी राष्ट्रवादीचा अध्यक्ष आहे. त्यांच्यापेक्षा मला निश्चितच राष्ट्रवादीबद्दल अधिक माहिती आहे. मी थकलो नसल्याने त्यांच्या वक्तव्याला अर्थ नाही,' असे स्पष्टीकरण पवारांनी देत या विषयाला पूर्णविराम दिला.

अजित पवारांनीही घेतला सुशीलकुमारांचा समाचार

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पुण्यात सुशीलकुमार शिंदें यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला. ते म्हणाले, 'शिंदे यांचे ते मत वैयक्तिक आहे. ते स्वत:च थकलेले आहेत, त्यामुळे त्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य केले. परंतु, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष थकलेले नसून, हे दोन्ही पक्ष कधीच थकणार नाहीत. दोन्ही पक्षांचे एकत्रीकरण करावयाचे की नाही हा निर्णय दोन्ही पक्षांतील वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल,' असे त्यांनी स्पष्ट केले.

VIDEO: खासदार नवनीत राणा यांनी देवीला काय घातलं साकड?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 10, 2019 03:26 PM IST

ताज्या बातम्या