Elec-widget

कुकडीचे पाणी देता येणार नाही, अजित पवारांच्या 'त्या' पत्राचं भाजपनं केलं भांडवल

कुकडीचे पाणी देता येणार नाही, अजित पवारांच्या 'त्या' पत्राचं भाजपनं केलं भांडवल

अजित पवारांचे ते सोशल मीडियावर फिरत असून खळबळ उडवली आहे.

  • Share this:

साहेबराव कोकणे,(प्रतिनिधी)

अहमदनगर,11 ऑक्टोबर: कर्जत-जामखेड मतदार संघातील पवारविरुद्ध शिंदे लढत चांगलीच रंगात आली आहे. या मतदार संघातील सर्वसामान्य माणसाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न माझे कुकडीचे पाणी, कुकडीचे पाणी जामखेडला देता येणार नाही, अशा आशयाचे पत्र तत्कालिन पाटबंधारेमंत्री अजित पवारांनी यांनी तत्कालीन आमदार सदाशिव लोखंडे दिले हे पत्र सोशल मीडियावर फिरत असून या पत्रामुळे तालुक्यात खळबळ उडवली आहे. भाजपने पवारांच्या या पत्राचे भांडवल करत प्रचाराचा प्रमुख मुद्दा बनवला असून राष्ट्रवादीवर कुरघोडी केली आहे.

18 वर्षापूर्वी 28 नोव्हेंबर 2201 रोजी अजित पवार यांनी तत्कालीन आमदार सदाशिव लोखंडे यांना पत्र पाठवून 'कुकडी प्रकल्पांतर्गत उपलब्ध असलेल्या वापराच्या  पाण्याचे पूर्ण नियोजन झाले असल्याने जामखेड तालुक्याला पाणी देता येत नाही'. असे लेखी पत्र देवून, जामखेड तालुक्याला कुकडीचे पाणी देण्यास अजित पवारांनी उघड विरोध केला होता. सध्या ते पत्र सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. जामखेडला पाणी देता येणार नाही, असे पत्र दिल्यानंतरही जामखेडच्या शेतकऱ्यांनी ज्या-ज्या वेळी कुकडीचे पाणी मागितले त्या-त्या वेळी 

राष्ट्रवादीचा आमदार निवडून द्या, कुकडीचे पाणी देतो, राष्ट्रवादीचा खासदार निवडून द्या, कुकडीचे पाणी देतो, जि.प.,पं.स. उमेदवार निवडून द्या कुकडीचे पाणी देतो, अशा अटी-शर्ती अजित पवारांनी जामखेडच्या जनतेला घालत मते मिळविण्याचा प्रयत्न केला. निव्वळ जनतेच्या डोळ्यांत धूळफेक केल्याचा आरोप भाजप कार्यकर्ते करत आहेत.

Loading...

अजित पवारांनी कुकडीचे पाणी जामखेडला देता येणार नाही, असे लेखी पत्र दिल्यानंतर सध्याच्या सरकारमध्ये पालकमंत्री राम शिंदे यांनी कर्जत तालुक्यातील गेल्या 40 वर्षांचा प्रलंबित असलेला तुकाई चारीचा प्रश्र मार्गी लावला. वर्षापूर्वी कुकडी प्रकल्याला सुधारित प्रशासकीय मंजुरी घेताना तुकाई चारीला मंजुरी मिळवली. यामुळे कर्जतचा उत्तरेकडील उर्वरित भाग सिंचनाखाली येणार आहे. त्याचबरोबर जामखेड तालुक्यातील जवळा आणि आगी या सीना नदीवर दोन कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचा समावेश कुकडी लाभक्षेत्रात केला. या माध्यमातून येत्या काळात जवळा, आगी, मतेवाडी, दिघी (ता.कर्जत), खडकी (ता.करमाळा) येथील हजारो हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. ही वस्तुस्थिती असताना कर्जत-जामखेडला कुकडीचे हक्काचे पाणी मिळवून देण्याची भाषा रोहित पवार कोणत्या तोंडाने करत आहेत. आजपर्यंत कर्जत जामखेडला हक्काच्या पाण्यावाचून वंचित ठेवायला हेच आणि आज निवडणुकीच्या तोंडावर जनतेची दिशाभूल करण्याचे काम हेच करत असल्याचा आरोप भाजपा करत आहे. भाजप सरकारला हे शक्य झाले, अजित पवारांना का शक्य झाले नाही? तर कर्जत-जामखेड तालुक्यांना कुकडीचे पाणी देण्याची पवारांची मानसिकताच नव्हती. त्यामुळे रोहित पवारांना कर्जत-जामखेडच्या पाणीप्रश्रावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही.

नाणारबद्दल बोलताना सेनेच्या ज्येष्ठ नेत्याची जीभ घसरली, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 11, 2019 06:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...