शिवसेनेत दाखल झालेल्या 'या' आमदाराच्या विरोधात श्रीरामपुरात बॅनरबाजी

शिवसेनेत दाखल झालेल्या 'या' आमदाराच्या विरोधात श्रीरामपुरात बॅनरबाजी

'सत्तेसाठी ससाणे साहेब, विखे साहेब, थोरात यांना फसवणाऱ्या गद्दार व बिनकामाच्या आमदाराला पाडायचं, असा मजकूर असलेले बॅनर शहरभर झळकले आहेत.

  • Share this:

हरीश दिमोटे, (प्रतिनिधी)

शिर्डी, 11 सप्टेंबर: शिवसेनेत दाखल झालेले कॉंग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या विरोधात श्रीरामपुरात बॅनरबाजी करण्यात आली आहे.'सत्तेसाठी ससाणे साहेब, विखे साहेब, थोरात यांना फसवणाऱ्या गद्दार व बिनकामाच्या आमदाराला पाडायचं, असा मजकूर असलेले बॅनर शहरभर झळकले आहेत. आमदार भाऊसाहेब कांबळे यांना सगळ्या गटांचा विरोध आहे. विशेष म्हणजे कांबळे यांना शिवसेनेत प्रवेश दिल्याने शिवसैनिकही नाराज आहेत. अज्ञात व्यक्तींनी कांबळेच्या विरोधात लावल्याचे समजते.

श्रीरामपूरचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांना सगळ्या गटांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. ससाणे, विखे आणी नंतर थोरातांची साथ सोडणारे कॉंग्रेसचे आमदार आता शिवसेनेत दाखल आहे. मात्र, तिथेही त्यांना विरोध होताना दिसतोय. आज श्रीरामपूर शहरभर आमदाराला पाडायचंय अशा प्रकारचे अनेक बॅनर अज्ञात व्यक्तींनी लावले आहेत.

आदिक, मुरकुटे ससाणे अशा दिग्गज नेत्यांचा मतदारसंघ असलेला श्रीरामपूर मतदारसंघ 2009 साली अनुसूचित जातीसाठी राखीव झाला आणि इथल्या राजकारणाला कलाटणी मिळाली. एक सामान्य दुकानदार जयंत ससाणे आणी विखे पाटील यांच्या साथीने श्रीरामपूरचा आमदार झाला. राजकारणाचा कोणताही गंध नसलेले भाऊसाहेब कांबळे जनसामान्यामधे मिसळून राहणारा माणूस म्हणून श्रीरामपूरच्या जनतेही त्यांना सतत साथ दिली. मात्र, भाऊसाहेब कांबळे यांनी श्रीरामपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत ससाणेंची साथ सोडत महाआघाडीत प्रवेश केला. तेव्हापासून ससाणे गट कांबळे यांच्यावर प्रचंड नाराज आहे. स्व.जयंत ससाणेंना खऱ्या अर्थाने कांबळेची साथ हवी असताना त्यांनी सोडलेला हात ससाणेंच्या जिव्हारी लागला होता.

विखे पाटील यांचे कट्टर समर्थक असलेले भाऊसाहेब कांबळे यांना विखे पाटील यांनी यावेळी लोकसभेची कॉंग्रेसची उमेदवारीही दिली होती. मात्र, सुजय विखे यांच्या जागावाटपाच्या आणि भाजपा प्रवेशाच्या घडामोडीमुळे विखे पाटील यांनी कांबळे यांना थांबण्याचा सल्ला दिलेला असताना त्यांनी विखेंचे विरोधक असलेल्या बाळासाहेब थोरात यांचा हात धरला आणी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे सदाशिव लोखंडे यांच्या विरोधात लोकसभा निवडणुक लढवली. या लोकसभा निवडणुकीत भाऊसाहेब कांबळे यांचा दारूण पराभव झाला. स्वतःच्या श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातही कांबळे आघाडी मिळवू शकले नाही.

आता आपण कॉंग्रेसच्या तिकिटावर आमदार होणार नाही, अशी कांबळेची धारणा झाल्याने कदाचित त्यांनी शिवबंधन बांधले आहे. मात्र, शिवसैनिकही त्यांच्या मागे उभे रहायला तयार नाही आहे. अगोदरच ससाणे,विखेपाटील,बाळासाहेब थोरात यांची कांबळेवर नाराजी असताना शिवसैनिकही नाराज झाले आहे. त्यामुळे यावेळी आमदाराला पाडायचंच, अशा प्रकारची बॅनरबाजी करून भाऊसाहेब कांबळे अज्ञात व्यक्तींनी इशारा दिला आहे. ऐनवेळी भाऊसाहेब कांबळे यांनी कॉंग्रेसचा हात सोडून शिवबंधन बांधले आहे. त्यामुळे कॉंग्रेसला उमेदवाराची शोधाशोध करावी लागते. युतीच्या जागावाटपात श्रीरामपूरची जागा सेनेकडे असल्याने सेनेच्या इच्छूकांची भाऊगर्दी झाली आहे. त्यातच भाऊसाहेब कांबळे यांना शिवसेनेत प्रवेश दिल्याने आता शिवसैनिकही संतापले आहे.

भाऊसाहेब कांबळे यांच्या विरोधात सगळ्या गटांची असलेली नाराजी कोणाच्या पथ्यावर पडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

SPECIAL REPORT:कोकण शिवसेनेत 'रात्रीस खेळ चाले'

Published by: Sandip Parolekar
First published: September 11, 2019, 8:56 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading