सगळ्यात पहिले मतदान केल्यानंतर काय म्हणाले अजित पवार?

बारामतीकरांनी आमच्यावर कायम विश्वास दाखवला. याही वेळी ते विश्वास दाखवतील

News18 Lokmat | Updated On: Oct 21, 2019 07:57 AM IST

सगळ्यात पहिले मतदान केल्यानंतर काय म्हणाले अजित पवार?

बारामती 21 ऑक्टोंबर : मतदानाला सुरूवात झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या मुळगावी काटेवाडीत मतदान केलं. मतदान केल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना बारामतीकरांचे आभार मानले. बारामतीकरांनी आमच्यावर कायम विश्वास दाखवला. याही वेळी ते विश्वास दाखवतील असं अजित पवारांनी सांगितलं. लोकशाहीचा हा उत्सव आहे. प्रत्येकानी मतदान करावं. निवडणुकीच्या प्रचारात अनेक गोष्टी होत असतात. मात्र सगळी कटुता आता संपली पाहिजे. आघाडीला उत्तमं यश मिळेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. तर गडचिरोलीसारख्या संवेदनशील मतदान केंद्रांवर दुपारी 3 वाजेपर्यंत मतदान पार पडेल. मतदानकेंद्रांवर मोठी लगबग सुरु असून जास्तीत जास्त मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

सरसंघचालक मोहन भागवत आणि अजित पवार यांनी बजावला मतदानाचा हक्क

दिव्यांगांसाठी विशेष सोय करण्यात आलीय. दरम्यान केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, केंद्रीय राखीव दल, गुजरात राज्य राखीव दलाचाही बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दुर्गम भागासाठी वायरलेस सेट तसेच संवेदनशील केंद्राच्या टेहाळणीसाठी ड्रोनचाही वापर करण्यात येणार आहे. या शिवाय गुगल मॅपमध्ये सर्व मतदान केंद्रे टॅग केल्याने मतदान केंद्र नेमके कुठे आहे, किती जवळ किंवा लांब आहे हे मतदारांना घर बसल्या समजणार आहे.

आज मतदान, फडणवीस सरकारचं भवितव्य होणार मतपेटीत बंद!

या गोष्टींची काळजी घ्या

Loading...

1. सोमवारी  मतदानासाठी बाहेर पडताना  स्वतःचा मोबाईल घेऊन  जाऊ नका.

2. मतदान बुथमध्ये मोबाईल नेण्यासाठी बंदी आहे. तिथे जाऊन परत येण्यापेक्षा मोबाईल सोबत घेऊ नये. त्यामुळे वेळ वाचेल.

3. मतदानाला जाण्याआधी आयोगाच्या APP वर आपले नाव आणि मतदान केंद्र आधीच जाणून घ्या. त्यामुळे तुमचा खूप वेळ वाचेल.

4. मतदान केंद्राबाहेरही मतदतीसाठी अनेक केंद्र उपलब्ध असतात. त्या ठिकाणाहूनही तुम्हाला माहिती मिळू शकते.

5.मतदान करताना लक्ष द्या की स्लिप येईपर्यंत (7 सेकंद)  बटण दाबून ठेवा. बीप असा आवाज येईल. त्यानंतरच तिथून बाहेर पडा.

6. EVM मशीनवर बटण दाबताना लक्षात ठेवा की VVPAT मधून स्लिप बाहेर येईपर्यंत बटणावरचं बोट काढू नका.

7. VVPAT स्लिपसह आपलं टाकलेलं मत त्याच उमेदवाराला पडलेलं आहे की नाही याची खात्री करा.

8. काही तक्रार असल्यास संबंधीत केंद्र अधिकाऱ्याकडे तुम्ही तुमची तक्रार किंवा सूचना नोंदवू शकता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 21, 2019 07:53 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...