उपासमारीची वेळ, नाभिक समाजासाठी 'वंचित'च्या नगरसेवकानं रस्त्यावर कापले केस

उपासमारीची वेळ, नाभिक समाजासाठी 'वंचित'च्या नगरसेवकानं रस्त्यावर कापले केस

गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून लॉकडाऊन आहे. त्यामुळे नाभिक समाजावर उपासमारीची वेळ आली आहे.

  • Share this:

सोलापूर,9 जून: संपूर्ण देशात कोरोणा व्हायरसचा प्रादुर्भाव वाढतच आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून लॉकडाऊन आहे. त्यामुळे नाभिक समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. कटिंगचे दुकाने सुरु करण्यास राज्य सरकारनं परवानगी द्यावी, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांनी रस्त्यावर प्रतिकात्मक केस कापून अनोखं आंदोलन केलं.

हेही वाचा...मुंबई महापालिकेच्या उपायुक्तांचा कोरोनामुळे मृत्यू, उपचारादरम्यान झालं

राज्य सरकारने गेल्या आठवड्यापासून काही व्यवसाय, उद्योग व दुकाने यांना सशर्त उघडण्याची परवानगी दिली आहे. मात्र, गेल्या तीन महिन्यापासून नाभिक समाजाचे उपजिविकेचे साधन असलेले कटिंग दुकान, पार्लर यांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे नाभिक समाजावर उपासमारीची वेळ आली आहे.

कुटुंब व दैनंदिन गरजा भागवण्याकरता इतर व्यवसाय व उद्योगाप्रमाणे नाभिक समाजाच्या सलून दुकानांनाही नियम व अटी घालून व्यवसाय चालू करण्यास परवानगी देण्यात यावी. किंवा व्यवसाय सुरू न झाल्यास नाभिक समाजाच्या प्रत्येक कुटुंबाला महिना 10 हजार रुपये अनुदान स्वरूपात देण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी केली आहे.

हेही वाचा...कोरोनाविरोधी भारतीयांना मिळाली ताकद; 30% संक्रमित उपचारविनाच बरे झाले?

नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखाली प्रतिकात्मक स्वरुपात कटिंग करून आंदोलन करण्यात आले. यावेळी नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी नगरसेवक गणेश पुजारी यांचे केस कट करून राज्य शासनाच्या विरोधात निषेध व्यक्त केला. याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा निरीक्षक बबन शिंदे, अनिरुद्ध वाघमारे तसेच नाभिक समाजाचे शहर अध्यक्ष मोहन जमदाडे, भारत शिरसागर यशवंत शेंद्रे आदी उपस्थित होते.

संपादन- संदीप पारोळेकर

First published: June 9, 2020, 4:51 PM IST

ताज्या बातम्या