शिवसेनेच्या माजी अध्यक्षाच्या मुलाने प्रेमात केला विश्वासघात.. लॉच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

शिवसेनेच्या माजी अध्यक्षाच्या मुलाने प्रेमात केला विश्वासघात.. लॉच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

शिवरत्न याने गितांजलीला लग्नाचे आमिष दाखवले होते. तसेच तो तिला शारिरीक आणि मानसिक त्रासही देत होता.

  • Share this:

सागर सुरवसे,(प्रतिनिधी)

सोलापूर,20 ऑक्टोबर: जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि शिवसेनेचे माजी तालुकाध्यक्ष दीपक गायकवाड यांच्या मुलाला कंटाळून एका तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवरत्न गायकवाड असे आरोपीचे नाव असून त्याच्यासह शिवसेनेच्या मोगोळच्या विद्यमान नगरसेविका सीमा पाटील यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सोलापूरच्या सदर बझार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गीतांजली विलास पाटील (रा.कुरूल)असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. गीतांजलीने शुक्रवारी (15 नोव्हेंबर) रात्री 11 वाजेच्या सुमारास विजापूर रोडवरील वॉटर प्रंट या इमारतीतील फ्लॅटमध्ये गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली होती. गीतांजली कायद्याचे शिक्षण घेत होती. शिवरत्न याने गितांजलीला लग्नाचे आमिष दाखवले होते. तसेच तो तिला शारिरीक आणि मानसिक त्रास देत होता. विलास मारुती पाटील (वय 57, रा.कुरुल ता.मोहोळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन तरुणीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शिवरत्न दीपक पाटील व सीमा सुभाष पाटील (दोघे रा. मोहोळ) विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट पुढील तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गीतांजली आणि शिवरत्नचे मागील आठ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. शिक्षणसाठी सोलापुरात राहण्यास असलेल्या गीतांजली यांना संशयित आरोपी शिवरत्न याने या काळात लग्नाचे आमिष दाखविले होते. यामुळे गीतांजली यांनी त्याच्यावर विश्वास टाकला होता. परंतु लग्नाविषयी विचारणा केल्यानंतर मात्र शिवरत्न आणि त्याची आत्या सीमा पाटील यांनी संगनमत करुन गीतांजली यांना लग्नास नकार दिला. त्याचबरोबर या दोघांनी गीतांजली यांना मानसिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून गीतांलजी यांनी आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी गीतांजलीने लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली आहे. त्यात तिने प्रेमसंबंधाबाबतचा उल्लेख केला आहे.

आत्महत्येपूर्वी मैत्रिणीला केला होता फोन

प्रेमसंबंधातून निराश झालेल्या गीतांजली यांनी आपल्या भावना मैत्रिणीजवळ व्यक्त केल्या होत्या. दरम्यान शुक्रवारी रात्रीही दोघींमध्ये याविषयावरुन चर्चा झाली. मैत्रिणीने गीतांजलीचे मन वळवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर मैत्रिण तेथून निघून गेली. नंतर गीतांजलीने मैत्रिणीला फोन करुन जीवनयात्रा संपवणार असल्याचे सांगितले. यामुळे मैत्रिणीने गीतांजली राहत असलेल्या घराकडे धाव घेतली. परंतु तोपर्यंत उशीर झाला होता.

First published: November 20, 2019, 12:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading