• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • युनियन बँकेच्या कोल्हापुरातील शाखेवर दरोड्याचा प्रयत्न

युनियन बँकेच्या कोल्हापुरातील शाखेवर दरोड्याचा प्रयत्न

बँकेतील सर्व रक्कम आणि सोन सुरक्षित असल्याची बँक कर्मचाऱ्यांनी पोलिसांना दिली माहिती.

  • Share this:
कोल्हापूर, 08 जानेवारी: कोल्हापूर जिल्ह्यातील धामोड इथल्या युनियन बँकेच्या शाखेवर दरोड्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती राधानगरी पोलिसांनी दिली आहे. धामोड बाजारपेठेत युनियन बँकेची शाखा आहे. सगळ्या तपासानंतर पोलिसांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान बँकेतील पैसे आणि रक्कम सुरक्षित असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी तालुक्यामधील धामोड बाजारपेठेतील युनियन बँकेची शाखा आहे. यामध्ये दरोडेखोरांनी बँकेचं शटर तोडण्याचा प्रयत्न केला. सकाळी बँकेचे कर्मचारी आले तेव्हा शटर तोडलेलं होतं. बँकेच्या स्ट्राँग रूम मधली 16 कोटी रुपयांची रक्कम लंपास केल्याची प्राथमिक माहिती होती मात्र घटनास्थळी जाऊन पोलिसांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली यावेळी जी माहिती समोर आली त्यानुसार बँकेत चोरीचा प्रयत्न झाला मात्र तो अयशस्वी ठरला.  कोणतीही रक्कम चोरीला गेलेली नाही असं स्पष्टीकरण पोलिसांकडून देण्यात आले आहे सध्या घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून याबाबतचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे. हेही वाचा-पोटच्या 10 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करत होता HIV बाधीत बाप याआधी यशवंत सहकारी बँकेवर चोरांनी दरोडा टाकला होता. त्या घटनेला 11 महिने पूर्ण होतात तोपर्यंत धामोड इथल्या बँकेवर चोरट्यांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला होता मात्र तो अपयशी झाल्य़ाची माहिती स्थानिकांनी मिळताच नागरिकांसह बँक कर्मचाऱ्यांचा जीव भांड्यात पडला आहे. हेही वाचा-पंढरपुरात मठामध्ये रक्ताचा सडा, मठाधिपतींची निर्घृण हत्या हेही वाचा-माणुसकीला काळीमा! साखर झोपेत असलेल्या तरुणाला जिवंत जाळलं हेही वाचा-वृद्ध दाम्पत्याने मुलासारखं समजून सांभाळलं, त्यानेच विश्वासघात करून गळा घोटला
Published by:Kranti Kanetkar
First published: