कोल्हापूर, 12 मार्च: राज्यात कोरोना व्हायरसचा (coronavirus) प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढला आहे. कोरोनाचे वाढते संक्रमण रोखण्यासाठी 15 ते 21 मार्च 2021 दरम्यान नागपुरात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. पुण्यातही 31 काही कडक निर्बंध आज रात्रीपासून लागू केले जाणार आहेत. राज्यातील अन्य काही शहरांमध्येही लॉकडाऊन लागू होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी गर्दी टाळावी, विना मास्क बाहेर पडू नये असे आवाहन राज्य सरकारकडून वारंवार करण्यात येत आहे. राज्य सरकारच्या सर्व सूचना पायदळी तुडवण्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापूर (Kolhapur) मध्ये घडला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील हळदी परिसरात चक्क दारु पिऊन आणि चिअर गर्ल्स (cheer girls) नाचवून राडा करण्यात आाला आहे. ऊस वाहतूक ट्रॅक्टर चालकांनी हा राडा घातल्याची माहिती आहे. भोगावती कारखान्यासाठी हे चालक ऊस वाहतूक करत होते. कारखान्याचा गळीत हंगाम संपल्याच्या आनंदात त्यांनी चक्क चिअर गर्ल्स नाचवल्या. यावेळी सोशल डिस्टसिंगचा (social distancing) चा संपूर्ण फज्जा उडाला होता. तसेच सर्व जण विनामास्क उपस्थित होते. या सर्व घटनेचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल (Viral Video on Social Media) झाला आहे.
मुख्य रस्त्यावरच स्टेज तयार करुन डॉल्बीच्या आवाजात चिअर गर्ल्स नाचत होत्या. दारुच्या नशेतील ऊसतोड कामगार आणि तरुणही त्यांच्यासोबत नाचत होते. हा सर्व प्रकार पाहण्यासाठी रस्त्यावर मोठी गर्दी जमली होती. त्यामुळे वाहतुकीची देखील चांगलीच कोंडी झाली होती.
(हे वाचा : कोरोनाच्या नावाखाली आरोग्य यंत्रणेकडून 59 कोटींचा खर्च, घोटाळ्यासंदर्भात थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार )
कोरोना महामारीमुळे अनेक प्रकारचे निर्बंध राज्यात लागू आहेत. हे निर्बंध धुडकावून हा सर्व प्रकार घडला आहे. त्यामुळे याला जबाबदार असलेल्या 'ट्रॅक्टर वाहनचालकांवर काय कारवाई होणार?' हा प्रश्न आता विचारला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Kolhapur, Lockdown, Sugar facrtory, Viral video.