Home /News /maharashtra /

शाब्बास... क्रिकेट खेळताना पाय मोडला, विद्यार्थी अ‍ॅम्बुलन्समधून थेट गेला परीक्षा केंद्रावर

शाब्बास... क्रिकेट खेळताना पाय मोडला, विद्यार्थी अ‍ॅम्बुलन्समधून थेट गेला परीक्षा केंद्रावर

ऑपरेशन झाल्यावर ललित थेट रुग्णवाहिकेतून परिक्षा केंद्रावर दिला आणि भौतिकशास्त्राचा पेरर दिला.

कोल्हापूर 25 फेब्रुवारी : अभ्यास, परीक्षा म्हटल की अनेकांच्या अंगावर काटा येतो त्यातच सध्या परीक्षांचे दिवस सुरू आहेत, म्हणूनच अभ्यासाचा कंटाळा आला म्हणून क्रिकेट खेळताना एका विद्यार्थ्याचा पाय मोडला. त्यामुळे परिक्षेचं काय होणार असा प्रश्न त्याला पडला. पण  पायावर उपचार झाल्यानंतर प्लास्टर बांधलेल्या अवस्थेतच तो थेट रुग्णवाहिकेतून  परीक्षा केंद्रावर आला आणि  त्या विद्यार्थ्यांन पेपरही दिला.  कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा तालुक्यातील पारेवाडी गावात ही घटना घडलीय. या अवस्थेतही परिक्षेसाठी जाणाऱ्या या जिगबाज विद्यार्थ्याचं सर्वांनी कौतुक केलंय. पारेवाडी मधला ललित निकम हा विद्यार्थी सध्या बारावी सायन्स मध्ये शिकतोय. अभ्यासाचा कंटाळा आला म्हणून रविवारी संध्याकाळी ललित मित्रांसोबत क्रिकेट खेळत होता. त्यावेळी बॉल पकडताना त्याची आणि दुसऱ्या खेळाडूची जोरदार धडक झाली. यात ललितच्या पायाला गंभीर दुखापत झाली. मित्रांनी त्याला तात्काळ दवाखान्यात आणले. पण पायाचे हाड मोडल्यामुळे त्याला प्रचंड वेदना होत होत्या. डॉक्टरांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचं सांगितलं पण सोमवारी ललितचा भौतिकशास्त्राचा पेपर होता त्यानंतर परीक्षा विभागाशी संपर्क साधून त्याला स्वतंत्र कक्षात पेपर सोडण्याची परवानगी मिळाली. मुंबई-पुणे महामार्गावरील टोलमध्ये मोठी वाढ! प्रवाशांच्या खिशाला बसणार कात्री मग त्याच्यावरची शस्त्रक्रियाही यशस्वीपणे पार पडली. त्यानंतर सोमवारी तो थेट दवाखान्यातून रुग्णवाहिकेत बसून परीक्षा केंद्रावर आला. त्याला बेंचवर बसता येत नसल्यामुळे त्याच्यासाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली होती आणि यापुढचे सगळे पेपर तो रुग्णवाहिकेतून येऊन देणार आहे. अबब! रुग्णाच्या पोटातून काढली तब्बल 7 किलोंची किडनी सध्या परिक्षांचे दिवस सुरू होत आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांनी खरं तर काळजी घेणे गरजेचे आहे मनोरंजन, खेळ हे करत असतानाच अपघात होऊ नयेत याची खबरदारी विद्यार्थ्यांसोबत पालकांनीही घेणे गरजेचे आहे नाहीतर वर्षभर केलेले कष्ट वाया जाऊ शकतात याचं भान विद्यार्थ्यांनी ठेवायलाच हवं असं मत शिक्षकांनी व्यक्त केलंय.
Published by:Ajay Kautikwar
First published:

Tags: Kolhapur accident

पुढील बातम्या