चुलतीच्या अस्थी घेऊन जाताना काळाचा घाला, एसटी बसच्या भीषण अपघातात गमावला जीव

चुलतीच्या अस्थी घेऊन जाताना काळाचा घाला, एसटी बसच्या भीषण अपघातात गमावला जीव

अपघातात दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

  • Share this:

कोल्हापूर, 10 जानेवारी : कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी मार्गावर निगवे खालसा फाट्यानजीक एसटी बस आणि ट्रॅक्टरमध्ये समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. अपघातग्रस्त बसमध्ये 22 प्रवासी होते. अपघातात दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तर एकाचा मृत्यू झाला आहे.

गारगोटी मार्गावर गुरुवारी रात्री झालेल्या या अपघातात बसमधील एकूण 11 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना त्वरित जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून, करवीर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

शिवसेनेचे कार्यालय जाळले, अक्कलकुव्वा शहरात तणाव, जमाव बंदी लागू

दत्तात्रय तुकाराम पाटील (वय 52, रा. निगवे खालसा, ता. करवीर) ठार झाले. मृत दत्ताराम पाटील यांच्या चुलतीचं 12 दिवसांपूर्वी निधन झालं होतं. त्यांच्या अस्थी घेऊन दत्ताराम पाटील पंढरपूरकडे चालले होते. अपघातातील इतर दोघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना रुग्णवाहिकेतून उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले.

वृद्ध दाम्पत्याने मुलासारखं समजून सांभाळलं, त्यानेच विश्वासघात करून गळा घोटला

बसचालक विनायक महिपती मेंगाणे (वय 32, रा. शेळेवाडी, राधानगरी), साताप्पा महादेव लोकरे (60, रा. कळंबा), पद्माकर झारीचंद कारमोरे (रा. बार्शी, सोलापूर), गुणवंत कारभारी मुंडे (रा. मालेगाव, बार्शी), गौतम बाळू कांबळे (रा. विचारे माळ, कोल्हापूर), बळवंत एम. पाटील (52, रा. निगवे खालसा), लता अरविंद तानवडे (45), अरविंद महिपती तानवडे (50), वैषाली बाजीराव तानवडे (35), बाजीराव महिपती तानवडे (42, रा. माळवे खुर्द, कागल), राहुल पोपट लोंढे (45, रा. भोसरी) अशी जखमींची नावे आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 10, 2020 08:09 AM IST

ताज्या बातम्या