कोल्हापूर 20 मार्च: निर्भया सामुहिक बलात्कार प्रकरणातल्या सर्व आरोपींना आज सात वर्षानंतर फाशी झाली. त्यानंतर पुढचा नंबर कुणाचा याची चर्चा सुरू झालीय. तब्बल 42 मुलांच्या हत्येची कबुली देणाऱ्या कोल्हापूरच्या दोन बहिणींना फाशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सर्व महाराष्ट्रातच नाही तर देशात या हत्याकांडाने प्रचंड खळबळ उडाली होती. अतिशय थंड डोक्याने या बहिणींनी अतिशय क्रुपपणे मुलांची हत्या केल्याचं उघड झालं होतं. 1996 मध्ये हे प्रकरण उघडकीस आलं होतं.
या बहिणींना सुप्रीम कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यांनी केलेला दयेचा अर्ज राष्ट्रपतींनी नुकताच फेटळला आहे. त्यामुळे या बहिणींना आता फाशी होणार असा कयास बांधला जातोय. असं झालं तर स्वातंत्र्यानंतरच्या इतिसाहात त्या फाशी झालेल्या पहिल्याच महिला असणार आहेत.
सीमा गावित आणि रेणुका शिंदे अशी या बहिणींची नावं आहेत. त्यांची आई अंजनाबाई ही या सगळ्या प्रकरणाची सूत्रधार होती. उलट्या काळजाच्या या मायलेकींनी मुलांना पळवून आणलं, त्यांना भीक मागायला लावलं आणि त्यांची हत्या केली. त्यांनी 42 मुलांची हत्या केल्याची कबुली दिली होती. कोर्टात मात्र 9 प्रकरणेच सिद्ध होऊ शकली.
शेतात गेलेल्या आई आणि मुलाचा निर्घृण खून, दुहेरी हत्याकांडाने खळबळ
अजंनबाईने मुलं पळविण्याची सुरुवात केली. त्यानंतर तिने त्या दोघींना त्यात सहभागी करुन घेतलं होतं. या मुलांकडून पाकिटमारी, चोरी, असे गुन्हेही त्या करून घेत होत्या. घटना उघडकीस आल्यानंतर वर्षभरातच अंजनाबाईचा मृत्यू झाला. त्यामुळे नंतर काही वर्ष त्या बहिणींविरुद्ध खटला चालला होता.
हे वाचा...