कोल्हापूर, सांगलीला पुन्हा पूराचा धोका, लोकांना पुन्हा सोडावं लगणार घर?

कोल्हापूर, सांगलीला पुन्हा पूराचा धोका, लोकांना पुन्हा सोडावं लगणार घर?

पावसाची स्थिती लक्षात घेऊन कोल्हापूर जिल्ह्यातल्या चिखली ग्रामस्थांचं प्रशासनाने स्थलांतर केलंय. जिल्हा प्रशासनाकडून चिखली आंबेवाडी ग्रामस्थांसाठी आदेश काढण्यात आला होता.

  • Share this:

पुणे, 8 सप्टेंबर : कोल्हापूर आणि सांगली भागात असणार्‍या धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे पंचगंगा नदीची पूर पातळी वाढते आहे. त्यामुळे सरकार आधीच सतर्क झालं आहे. परिस्थिती नियंत्रणात राहण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. ते म्हणाले, आलमट्टी प्रशासनासोबत बोलणं झालं आहे. त्यानुसार आलमटी धरणातून 2 लाखांहून अधिक पाणी सोडण्यात येत आहे. महिन्याभरापूर्वीची पूर परिस्थिती लक्षात घेता, कोल्हापूर आणि सांगली पूरग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे.

या सर्व भागावर राज्यसरकारचं लक्ष असून सर्व यंत्रणा सज्ज असल्याचंही  चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. पुण्यात एका कार्यक्रमासाठी पाटील हे आले होते. या कार्यक्रमानंतर कोल्हापूर आणि सांगली भागात पूर परिस्थिती पुन्हा निर्माण झाली आहे का असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी सरकार करत असलेल्या उपायोजनांची माहिती दिली.

चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली पत्नीची हत्या

पावसाची स्थिती लक्षात घेऊन कोल्हापूर जिल्ह्यातल्या चिखली ग्रामस्थांचं प्रशासनाने स्थलांतर केलंय. जिल्हा प्रशासनाकडून चिखली आंबेवाडी ग्रामस्थांसाठी आदेश काढण्यात आला होता. पाणी पातळी वाढत असल्याने गावकऱ्यांचे स्थलांतर करण्यात आले. जनावरांसह संसारोपयोगी साहित्य घेऊन गावकरी गावातून बाहेर आले. आधीच्या महापूरावेळी चिखली आणि आंबेवाडी गावांना सर्वात मोठा फटका बसला होता. या ठिकाणी जिल्ह्यातलं सर्वात मोठं रेस्क्यू ऑपरेशन राबवले होतं.

गडचिरोलीत 300 गावांचा संपर्क तुटला

संततधार पावसामुळे घरावर भिंत कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाल्याची घटना घडली. तुमसर तालुक्याच्या सिंधपुरी येथे रविवारी सकाळी ही घटना घडली. मिलकराम इसाराम शेंडे (54) याचा भिंतीच्या खाली दबून मृत्यू झाला आहे. तर कुंदा नेवारे (24) आणि निर्मला श्यामराव वगरे (50) या दोघी गंभीर जखमी झाल्या आहेत.

महालक्ष्मीचे रुप समजून सासूबाईंनी केली आपल्या दोन्ही सुनांची पूजा...

मिळालेली माहिती अशी की, रविवारी सकाळी 7 वाजता सगुणाबाई शेंडे यांच्या घराची भिंत शेजारच्या घरावर कोसळली. मातीच्या ढिगाऱ्याखाली तीन जण दबले. गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत तिघांनाही बाहेर काढले. मात्र, तोपर्यत मिलकराम यांचा मृत्यू झाला होता. जखमींना तात्काळ उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोघींची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. दरम्यान, चार वर्षांपूर्वी सिंधपुरी गावात तलावाची पार फुटल्याने गावातील अनेक घरे कोसळून पडली होती. मात्र, गावातील लोकांना अजुनही घरकुलचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे बहुतांश गावकऱ्यांना धोकादायक घरात वास्तव्य करावे लागत आहे.

कलम 371ला धक्का लावणार नाही- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

दरम्यान, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. गडचिरोली जिल्ह्यात पूरपरिस्थिती गंभीर झाली असून वीस मार्ग बंद आहेत. जवळपास तीनशे गावांचा संपर्क तुटला आहे. भामरागडची पूर परिस्थिती गंभीर झाली आहे. हेलिकॉप्टरने जिल्हाधिकारी शेखरसिंग आणि पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी भामरागडच्या पुरपरिस्थितीची पाहणी केली. पर्लकोटा आणि पामुलगौतम नदीच्या पाण्याने चारी बाजुने भामरागडला वेढा दिल्यानं सहाशे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 8, 2019 08:24 PM IST

ताज्या बातम्या