कोल्हापूर, 09 ऑक्टोबर :गोव्यातून येणारा बनावट दारूसाठा आणि साडेचार लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळालं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा-गडहिंग्लज मार्गावर पोलिसांनी ही मोठी कारवाई केली. या मार्गावरून गोवा बनावटीची दारू बेकायदेशीरपणे विकली जात असल्याचा पोलिसांना संशय होता. त्यांनी संशयास्पद रितीत वन विभागाच्या कार्यालयासमोर जाणार्या गाड्यांची तपासणी केली.
या तपासणीदरम्यान एका छोट्या टेम्पोमधून साडेचार लाखांच्या मुद्देमालासह गोवा बनावटीची दारू अवैधपणे पकडण्यात आली असून पोलिसांनी तातडीनं कारवाई केली आहे. पोलिसांनी टेम्पोमधून सुमारे दीड लाखांची गोवा बनावटीची दारु आणि मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी गाडीची कागदपत्र नसल्यानं आणि अवैध दारू विक्री करणाऱ्या इस्माईल युनूस मनीयार ,इसाक पठाण ,उम्माकांत दशरथ करंडे रा. साळवेश्वर या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
हे वाचा-मोठी बातमी! भीमा-कोरेगाव प्रकरणी NIAची मोठी कारवाई, आणखी एकाला अटक
अवैध दारू घेऊन जाणाऱ्या तीन जणांविरोधात सोलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की आजरा गडहिंग्लज मार्गावर छोटा टॅम्पो संशयास्पद पद्धतीनं गडहिंग्लजच्या दिशेने जाताना आढळला सहाय्यक पोलिस निरिक्षक बालाजी भांगे यांच्या मार्गदर्शनाखाली टेम्पोची झडती घेतली असता त्यामध्ये विविध ब्रॅण्अवैध दारू घेऊन जाणाऱ्या तीन जणांविरोधात सोलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ड गोवा बनावटीची दारुचे बॉक्स आढळून आले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.