Home /News /maharashtra /

कोल्हापुरातही शिवसेना, काँग्रेस, आणि राष्ट्रवादी एकत्र, भाजप सत्ता राखणार का?

कोल्हापुरातही शिवसेना, काँग्रेस, आणि राष्ट्रवादी एकत्र, भाजप सत्ता राखणार का?

कोल्हापुरच्या जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदासाठी कोण गाठणार मॅजिक फिगर? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

कोल्हापूर,2 जानेवारी: कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदाची गुरूवारी दुपारी 2 वाजता निवड होणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आल्याने भाजप सत्ता राखणार का? अशी स्थिती निर्माण झाला आहे. दुसरीकडे, जुन्या मित्रपक्षांची सोबत घेऊ न सत्ता टिकवण्याची शिकस्त भाजपने चालवली आहे. त्यामुळे कोल्हापूरात अनेक नाट्यपूर्ण घडामोडींची शक्यता आहे. आता कोल्हापुरच्या जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदासाठी कोण गाठणार मॅजिक फिगर? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे, महाआघाडीचे सदस्य बेळगावमधून कोल्हापूरमध्ये दाखल होणार आहेत. भाजपचे सदस्य कराडमधून कोल्हापूरमध्ये दाखल होणार आहेत. अकरा वाजता अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. भाजपची सत्ता राखण्याची कसोटी गेल्या अडीच वर्षांत राज्यात सत्ता असल्याने भाजपला अंतर्गत मतभेद असतानाही सत्ता राखणे सोपे गेले. आता भाजप विरोधी बाकावर असल्याने साहजिकच पूर्वीचा राजकीय प्रभाव राहिलेला नाही. अशा स्थितीत जिल्हा परिषदेची सत्ता राखणे ही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची कसोटी असणार आहे. गेल्यावेळी चुरशीने निवडणूक होऊ न भाजप व काँग्रेसनेही प्रत्येकी 14 जागांवर विजय मिळवला होता. यामध्ये चंद्रकांत पाटील यांनी आपल्या राजकीय प्रभावाचा करिष्मा दाखवत शौमिका महाडिक यांच्या रूपाने पहिला भाजपचा पहिला अध्यक्ष बनवला होता. त्यांची अडीच वर्षांची मुदत संपल्यानंतर नवा अध्यक्ष निवडण्यासाठी गुरुवारी दुपारी सभा होणार आहे. दरम्यान, चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ, काँग्रेसचे सतेज पाटील, शिवसेनेला पाठिंबा दिलेले राजेंद्र पाटील यड्रावकर हे तीन मंत्री यांच्यातील 'सामना' अत्यंत चुरशीचा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आमदार विनय कोरे, आमदार प्रकाश आवाडे, माजी खासदार राजू शेट्टी आणि महाडिक परिवार यांच्या राजकीय ताकदीचा वापर करून सत्ता टिकवण्यासाठी भाजप कसोशीने प्रयत्न करत आहे. दुसरीकडे, राज्यात गेल्यावर्षी झालेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुका नंतर राजकीय समीकरणे बदलली आहेत. महाविकास आघाडीच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्हा परिषद ताब्यात घेण्याचे प्रयत्न पाटील, मुश्रीफ यांनी चालवले आहेत. त्याला शिवसेनेकडून साथ मिळणार असल्याचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी स्पष्ट केले आहे. काँग्रेसचे चौदा, राष्ट्रवादीचे 11 आणि शिवसेनेचे 10 तसेच मित्र पक्ष असे 40 सदस्य आपल्याकडे असल्याचा दावा सतेज पाटील यांनी केला आहे. काय आहे पक्षीय बलाबल? एकूण सदस्य संख्या 67 मॅजिक फिगर- 35 भाजप –14 शिवसेना –10 कॉग्रेस –14 राष्ट्रवादी –11 जनसुराज्य –6 ताराराणी आघाडी –3 चंदगड युवक आघाडी –2 स्वाभिमानी –2 आवाडे गट –2 भुदरगड विकास आघाडी-2
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Bjp Leader chandrakant patil, Chandrakant patil, Kolhapur news

पुढील बातम्या