Home /News /maharashtra /

मुलगी पळून गेल्याच्या रागात वडिलांनीच लावले श्रद्धांजलीचे बॅनर; कोल्हापूरमधील अजब प्रकार

मुलगी पळून गेल्याच्या रागात वडिलांनीच लावले श्रद्धांजलीचे बॅनर; कोल्हापूरमधील अजब प्रकार

मुलगी पळून गेल्याच्या रागात वडिलांनी मुलीला श्रद्धांजली वाहणारे बॅनर लावले आहेत.

    कोल्हापूर, 13 फेब्रुवारी : मुलगी आणि वडिलांचं नातं जगावेगळं असतं असं म्हणतात. मुलगी ही नेहमीचं आईपेक्षा वडिलांच्या अधिक जवळ असते. मात्र कोल्हापुरमध्ये एक अजब प्रकार घडलाय. मुलगी घरातून पळून गेली या रागात वडिलांनीच आमची मुलगी आमच्यासाठी मेली, असं जाहीर केलंय. त्यांनी चक्क मुलीला श्रद्धांजली देणारं बॅनर लावून तिला स्वर्गवासी जाहीर केलं आहे. धनश्री (बातमीतून बदनामी टाळण्यासाठी मुलीचं नाव बदललं आहे) घरातून पळून गेल्याचं लक्षात येताच तिच्या वडिलांनी मुलीला श्रद्धांजली वाहणारे बॅनर लावून तिला स्वर्गवासी जाहीर केलं आहे. लोकसत्ता या वृत्तापत्राने दिलेल्या वृत्तानुसार, मुलगी घरातून पळून गेली म्हणून अब्रू गेल्याची भावना धनश्रीच्या कुटुंबीयांना आल्याने त्यांनी हे बॅनर लावत राग व्यक्त केला आहे. बॅनरवर नेमकं काय लिहिलंय? बॅनरवर मोठ्या अक्षरात 'श्रद्धांजली' असं लिहण्यात आलं आहे. बॅनरवर धनश्रीचा फोटो लावण्यता आला आहे. फोटोखाली कैलासवासी असं लिहून मग मुलीचं नाव लिहिण्यात आलं आहे. धक्कादायक म्हणजे धनश्रीच्या फोटोखाली 'विश्वासघातकी' असा उल्लेखही कऱण्यात आला आहे. वाचा - हे फक्त भारतातच होऊ शकतं! व्हिडीओ कॉलवर उरकले लग्नाचे विधी, पाहा VIDEO बॅनरच्या उजव्या बाजूला 'शोकाकुल आत्मक्लेश' लिहित संदेश लिहिण्यात आला आहे. त्यात असं लिहिलं आहे की, “बाळ तू जन्माला येतानाच संधीवाताचा आजार तुझ्या आईला घेऊन आलीस. त्या वेदना सहन करत ज्या आईने तुझे सर्व हट्ट, लाड पुरवित मोठे केले ती दुर्दैवी आई. तुला तळहाताच्या फोडाप्रमाणे तिने जपलं. पण यापुढील तुझ्या आयुष्यात आनंद आणि सुख देण्यास आम्ही असमर्थ ठरलो म्हणून तू सोडून गेलीस. हा काळा दिवस पाहण्यासाठी जिवंत असलेला असा कमनशिबी बाप.” या बॅनरवरील मजकूर इतक्यावरच संपला नाही तर बॅनरवर एका लालपट्टीत बोध ही लिहिण्यात आला आहे. हे वाचून अशा वागणाऱ्या मुलींच्या मनाचे परिवर्तन होऊन त्या आपल्या आई वडिलांचा विश्वासघात करणार नाहीत ही अपेक्षा.. असं लिहिण्यात आलं आहे.मुलीच्या फोटोवर काळ्या रंगाने काट मारण्यात आली आहे. वाचा - वाढत्या घटनांमुळे लोकांचा संयम सुटला, महिलेवर अ‍ॅसिड फेकणाऱ्याला दिला चोप आजकाल ऑनर किलींगच्या घटानांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. मुलीने किंवा मुलाने दुसऱ्या जातीच्या जोडीदाराशी लग्न केलं तर त्यांची हत्या केली जाते. किंवा बेअब्रू झाली म्हणून कुटुंबाने आत्महत्या केल्याच्या घटनाही आपण ऐकल्याच असतील. या घटना दिवसागणिक वाढत चालल्या आहेत. त्यातच आता कोल्हापूरमध्ये वडिलांनीच मुलीविरोधात असे बॅनर लावल्याने संपूर्ण कोल्हापूरमध्ये हा चर्चेचा विषय बनला आहे. वाचा अजब प्रेम की गजब कहानी! नवरा-नवरीने हातात 7 महिन्याचं बाळ घेऊन उरकलं लग्न
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Kolhapur

    पुढील बातम्या