जुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात बजावली महत्त्वाची कामगिरी

जुन्नरच्या डॉक्टरची कमाल, COVIDवर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात बजावली महत्त्वाची कामगिरी

पुण्यातील एन.सी.एल या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या प्रयोगशाळेत त्यांनी ख्यातनाम शास्त्रज्ञ डॉ. सि.व्ही.रमना यांच्या मार्गदर्शनाखाली रसायनशास्त्रात PhD पूर्ण केली.

  • Share this:

 जुन्नर 24 सप्टेंबर: कोरोनावर जगभरात सध्या ज्या औषधाबद्दल चर्चा सुरू आहे त्या 'रेमडिसिव्हीर' च्या संशोधनात जुन्नरच्या तरुण संशोधकाने महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. महाराष्ट्रातील किल्ले शिवनेरीच्या परिसरात म्हणजेच शिवजन्मभूमीत जन्मलेले तरुण संशोधक व वैज्ञानिक डॉ. दिनेश पायमोडे यांची दखल अमेरिकेतील प्रतिष्ठेच्या 'रिचमंड टाईम्स' ने घेतली आहे. त्यामुळे जुन्नरची मान अधिकाधिक उंचावली गेली आहे अशी भावना व्यक्त होते आहे. या संशोधनात सहभागी असलेल्या डॉ. दिनेश यांच्याबद्दल मागील काही दिवसात सोशल माध्यमात मोठी चर्चा होत आहे.

पुणे-नाशिक महामार्गावर चाळकवाडी ही पिंपळवंडीची छोटीशी वाडी आहे. येथील मळ्यात डॉ.दिनेश याचे आई वडील जगन्नाथ आणि आई अंजना पायमोडे इथे राहतात. सुरवाती पासुनच घरची प्रचंड गरिबी, घरची फक्त 13 गुंठे शेती 2 मुले, आई वडिलांनी काबाडकष्ट करून  खंडाने जमीन घेऊन दुसऱ्याची शेती कसायला घेऊन वेळ प्रसंगी पोटाला चिमटा घेऊन दोनी मुलांना उच्चशिक्षित केले.

डॉ दिनेश आणि त्यांचा दुसरा भाऊ निलेश या दोघांनीही रसायनशास्त्र एमएससी केलेलं आहे. मागील 2 वर्षांपासून डॉ. दिनेश अमेरिकेत आहेत. तर निलेश पुण्यात नोकरी करत आहेत.

डॉ.दिनेश जगन्नाथ पायमोडे यांनी रेमडिसिव्हीर' या कोविड-19 वरील प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कौतुकास्पद कामगिरी केली आहे. रेमडिसिव्हीर हे अँटीवायरल औषध असुन ते सर्वात  प्रथम अमेरिकन कंपनी 'Gilead Sciences' ने प्रायोगिक तत्त्वावर 'Hepatitis C' या आजारावरील उपचारासाठी 2009मध्ये विकसित केले होते.

कोरोनानं दिवसभरात घेतला 459 जणांचा बळी, 19 हजारांनी रुग्णसंख्येत वाढ

Hepatitis C वर ते फारसे प्रभावशाली ठरले नाही हे समजताच कंपनीने त्याचे पुढील संशोधन थांबवले व तो साठा तसाच जतन करून ठेवला. 2020 सालाच्या सुरवातीला या औषधाची चाचणी कोविड-19 संक्रमित रुग्णांवर केली असता  हे औषध कोविड-19वर प्रभावी असल्याचे आढळून आले.

एप्रिल ते जुलै 2020च्या दरम्यान विविध देशांनी रेमडिसिव्हीरला कोविड-19 बाधीत व व्हेंटिलेटरवर असणार्‍या रुग्णां  उपचार म्हणून देण्यास परवानगी देण्यात आली. तथापि, केवळ 'Gilead Sciences' या एकमेव कंपनीकडे या औषधाचे पेटंट असल्याने आणि अधिक संशोधन झाले नसल्याने या औषधाचे उत्पादन हे मर्यादित आहे.

भारतातील सिप्ला व हेटेरो ड्रग या कंपन्यांना रेमडिसिव्हीरचे उत्पादन करण्यास यापुर्वीच परवानगी मिळाली आहे. सध्या कोरोना विषाणूने संपूर्ण जगाला विळखा घातला असताना, याची मागणी ही प्रचंड प्रमाणात आहे. त्यापद्धतीने पुरवठा होणे देखील आवश्यक आहे व ते सामान्य लोकांच्या खिशाला परवडेल अशा दरात उपलब्ध होणे देखील आवश्यक आहे. यामध्ये वापरली गेलेली रसायने ही सगळीकडे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत व म्हणून स्वस्त देखील आहेत.

हे एक नाविन्यपूर्ण संशोधन असून अमेरिकन केमिकल सोसायटीच्या  ऑरगॅनिक लेटर्स या नियतकालिकात ते प्रसिद्ध झाले आहे.

लवकरच होणार धोकादायक ट्रायल; मानवी शरीरात मुद्दाम सोडणार जीवघेणा कोरोनाव्हायरस

त्यांनी केलेल्या या कौतुकास्पद कामगिरीमूळे जुन्नर तालुक्याच्या शिरपेचात डॉ दिनेश पायमोडे यांनी मानाचा तुरा रोवला असून त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

रसायनशास्त्रात पुण्यातील एन.सी.एल या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या प्रयोगशाळेत त्यांनी ख्यातनाम शास्त्रज्ञ डॉ. सि.व्ही.रमना यांच्या मार्गदर्शनाखाली PhD पूर्ण केली. डॉ. दिनेश पायमोडे हे सध्या अमेरिकेतील 'Medicines For All'  (Virginia Commonwealth University, VA, USA) या औषधनिर्माण शास्रातील प्रतिष्ठित संशोधन संस्थेमध्ये 'शास्त्रज्ञ' पदावर कार्यरत आहेत.

Published by: Ajay Kautikwar
First published: September 24, 2020, 11:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading