Home /News /maharashtra /

जेजुरी गडावर यंदा ‘यळकोट यळकोट'चा, गजर नाही, तीन दिवस भाविकांना प्रवेशबंदी

जेजुरी गडावर यंदा ‘यळकोट यळकोट'चा, गजर नाही, तीन दिवस भाविकांना प्रवेशबंदी

शनिवारी 12 डिसेंबर ते सोमवार 14 डिसेंबर पर्यंत जेजुरीत भाविकांना प्रवेश बंद राहणार आहे. त्यामुळे राज्याच्या विविध भागातील भाविक भक्तांनी देवदर्शनासाठी जेजुरीत येऊ नये असं आवाहनही करण्यात आलं आहे.

    पुरंदर 10 डिसेंबर:  शासनाने मंदिरे सुरू केली तरी त्यासाठी नियम, अटी, शर्ती आहेत.भाविकांच्या सुरक्षिततेसाठी व कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कलम १४४ नुसार जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. यामुळेच येत्या सोमवारी आलेली सोमवती अमावास्या यात्रा आणि पालखी सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.शनिवारी 12 डिसेंबर ते सोमवार 14 डिसेंबर पर्यंत जेजुरीत भाविकांना प्रवेश बंद राहणार आहे. त्यामुळे राज्याच्या विविध भागातील भाविक  भक्तांनी देवदर्शनासाठी जेजुरीत येऊ नये, प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी केले आहे. येत्या सोमवारी (14 डिसेंबर) सोमवती अमावस्या असल्याने या पार्श्वभूमीवर पेशवे लॉज येथे ग्रामस्थ खांदेकरी, मानकरी, पुजारी, सेवेकरी, देवसंस्थान विश्वस्त मंडळ, नगरपालिका प्रशासन यांची संयुक्तिक बैठक घेण्यात आली. बैठकीत येत्या सोमवारी येणाऱ्या भर सोमवती अमावस्या यात्रा आणि मंगळवार पासून सुरू होणारा सहा दिवसांचा चंपाषष्टी उत्सव याबाबत चर्चा झाली. ही चिमुरडी आहे जगातली सगळ्यात ताकदवान मुलगी! फक्त 7 व्या वर्षी उचललं 80 किलो वजन चर्चेत सोमवती यात्रा रद्द करण्याचा तर चंपाषष्टी षढरास्त्रोत्सव ही साधेपणात साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी प्रमुख वतनदार इनामदार राजेंद्र पेशवे, सचिन पेशवे, ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष गणेश आगलावे, सचिव छबन कुदळे, उपाध्यक्ष आबा राऊत, विरोधी पक्षनेते जयदीप बारभाई, माजी नगरसेवक हेमंत सोनवणे, माजी प्रमुख विश्वस्त सुधीर गोडसे, विश्वस्त शिवराज झगडे, संदीप जगताप, पंकज निकुडे, रोहिदास माळवदकर ,रामचंद्र माळवदकर ,पंडित हरपळे, माणिक पवार ,अरुण खोमणे ,संजय खोमणेपाटील, बारा बलुतेदार संघाचे अध्यक्ष  संतोष खोमणे, ग्रामस्थ कृष्णा कुदळे, जालिंदर खोमणे, दिलीप मोरे, रवींद्र बारभाई, रमेश बयास, अनिल बारभाई, दिलीप आगलावे, राहुल बयास, राजेंद्र चौधरी, मानकरी, सेवेकरी, पुजारी उपस्थित होते. शेतकरी नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम, रेल्वे ट्रॅक बंद करण्याचा इशारा प्रशासनाच्या आदेश, सूचनांचे पालन करण्यात येईल, रूढी, परंपरेनुसार श्रींचे सर्व धार्मिक विधी करण्यात येतील. मात्र पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे. भाविकांनी प्रशासनाच्या आदेशानुसार 12 ते 14 डिसेंबरच्या काळात जेजुरीत येणे टाळावे. असे इनामदार पेशवे यांनी आवाहन केले आहे.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या