Home /News /maharashtra /

जेजुरीत भरलाय गाढवांचा बाजार, किंमत ऐकाल तर बसेल धक्का

जेजुरीत भरलाय गाढवांचा बाजार, किंमत ऐकाल तर बसेल धक्का

देव दर्शनानंतर भाविक गाढवांच्या बाजारात खरेदी विक्रीसाठी येतात. गुजरातच्या काठेवाडी गाढवांना सर्वात जास्त मागणी असते.

जेजुरी 09 जानेवारी : महाराष्ट्राचं लोकदैवत असेल्या जेजुरीत दरवर्षी भरत असलेली खंडोबा देवाची पौष पोर्णिमा यात्रा प्रसिद्ध आहे. खर्‍या अर्थाने अठरापगड जातीजमातींची ही यात्रा मनाली जाते. यात भटक्या विमुक्तांची संख्या मोठी असते. यात्रेनिमित्त येथे गाढवांचा बाजार भरतो. अशाच प्रकारचे बाजार मढी, सोनारी, माळेगाव (नांदेड) या ठिकाणी भरतात परंतु जेजुरीचा बाजार सर्वात मोठा मानला जातो. यात देशभरातून गाढवं विकायला येतात. त्यांची किंमत ही 5 हजारांपासून ते तब्बल 30 हजारांपर्यंत असते. पौष पौर्णिमेला ही यात्रा सुरू होते. शुक्रवारी पौर्णिमेचा कालावधी असल्याने दोन दिवस भरणाऱ्या या यात्रेसाठी राज्यभरातून वैदू, बेलदार, कुंभार, गाडीवहार , मातीवडार, कैकाडी, मदारी, गारुडी, घिसाडी, माकडवाले या भटक्या जमातीतील हजारो लोक जेजुरीत येऊ लागले आहेत. जेजूरी गडावर जाऊन देवदर्शन घेत होते. देव दर्शनानंतर भाविक गाढवांच्या बाजारात खरेदी विक्रीसाठी येतात. ग्रामीण भागात गाढवं हे उपयुक्त जनावर म्हणून ओळखले जाते. दुर्गम भागात माती, दगड, खडी, मुरुम व इतर वाहतुकीसाठी गाढवाचा वापर केला जातो. बाजारामध्ये गाढवाचे दात, वय पाहून त्याची किंमत ठरविली जाते. दोन दातांच्या गाढवांना दुवान, चार दातांच्या गाढवांना चौवान, कोरा, अखंड, जवान असे म्हटले जाते. मध्ये रेल्वेवरही आता गारेगार प्रवास, या मार्गावर धावणार AC लोकल बाजारात पूर्वी हजारांच्या संख्येत येणारी गावठी व काठेवडी जनावरे येत असत. यावर्षी गेल्या दोन दिवसात दीड हजारांवर जनावरे विक्रीसाठी आलेली होती. व्यापारी जास्त आणि जनावरे कमी यामुळे गाढवांची चढ्या भावाने खरेदी विक्री होत होती. बाजारात सर्वात जास्त मागणी असणार्‍या गुजरातहून येणार्‍या काठेवाडी गाढवांची संख्या मात्र कमी होती. साधारणपणे दोनशे अडीचशे जनावरे बाजारात आलेली होती. काठेवडी जनावरं उमदे आणि मोठे असल्याने त्यांच्या किंमतीही जास्त असतात. बाजारात गावठी जनावराला सात हजारापासून 30 हजारपर्यंतची मागणी होती.

बँक घोटाळा प्रकरण,NCPचे आमदार अनिल भोसले आणि त्यांच्या पत्नी विरोधात गुन्हा

काठेवाडी जनावराचा सौदा 25 हजारांच्या पुढे होता. यामुळे बाजारात तीन कोटीपर्यंतची उलाढाल झाली आहे. येथील व्यवहार वायदे बाजारातील व्यापाऱ्यांना लाजवेल असे असतात. मात्र वाढती स्पर्धा, यंत्रांचा वापर आणि औद्योगिकीकरणामुळे गाढवांचा वापर कमी होऊ लागला आहे. साहजिकच गाढवांची संख्या ही कमी होऊ लागली आहे. भविष्यात हे जनावर नामशेष होते की काय असाच प्रश्न ही निर्माण होऊ लागला आहे.  
Published by:Ajay Kautikwar
First published:

Tags: Jejuri, Jejuri khandoba

पुढील बातम्या