शिवाजी विद्यापीठाला 'आयएसओ' मानांकन... राज्यात ठरले पाहिले विद्यापीठ

शिवाजी विद्यापीठाला 'आयएसओ' मानांकन... राज्यात ठरले पाहिले विद्यापीठ

आयएसओ मानांकन मिळवणारे शिवाजी विद्यापीठ देशातले चौथे आणि राज्यातले पहिले अकृषी राज्य विद्यापीठ ठरले असल्याची माहिती शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी दिली आहे.

  • Share this:

संदीप राजगोळकर,(प्रतिनिधी)

कोल्हापूर,21 सप्टेंबर: जागतिक स्तरावर उत्कृष्टतेचा मापदंड निश्चित करणाऱ्या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टॅण्डर्डायझेशन (आयएसओ) या संस्थेकडून कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाला सर्वंकष शैक्षणिक गुणवत्तेसाठी 'आयएसओ 9001:2015' मानांकनाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे. हे मानांकन मिळवणारे शिवाजी विद्यापीठ देशातले चौथे आणि राज्यातले पहिले अकृषी राज्य विद्यापीठ ठरले असल्याची माहिती शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी दिली आहे.

शैक्षणिक प्रशासन, अभ्यासक्रमांची रचना व निर्मिती, अध्ययन-अध्यापन प्रक्रिया, संशोधन प्रकल्प, शैक्षणिक उपयोजन व नवतंत्रज्ञानाचा वापर, मूल्यांकन व मूल्यमापन, संबंधित घटकांशी सहसंबंध, परीक्षाविषयक कार्यपद्धती व सुधारणा, निकालाची प्रक्रिया तसेच पदवी प्रदान प्रक्रिया आदी अनेक निकषांवर गेले वर्षभर अखंडितपणे पाहणी, तपासणी, सूचना, सुधारणा करीत अखेर ट्यू-सूद (TUV SUD) या 'आयएसओ' विषयक पाहणी करणाऱ्या संस्थेने शिवाजी विद्यापीठाला 'आयएसओ 9001:2015’ प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी राज्यातील विविध विद्यापीठांतील विविध अधिविभाग, विभागांनी स्वतंत्रपणे हे प्रमाणपत्र मिळवले आहे. पण, संपूर्ण विद्यापीठ म्हणून प्रमाणपत्र प्राप्त करणारे शिवाजी विद्यापीठ राज्यातले पहिले ठरले आहे.

या प्रमाणपत्राचा कालावधी 9 सप्टेंबर 2019 ते 8 सप्टेंबर 2022 असा तीन वर्षांचा आहे. या काळात ट्यू-सूदकडून वर्षातून दोनदा विद्यापीठाचे मूल्यमापन करण्यात येत राहील. त्यासाठी विद्यापीठाने सुमारे 37 तज्ज्ञ अंतर्गत तपासनीसांची (इंटर्नल ऑडिटर) फळी निर्माण केली आहे. हे सुद्धा एक वेगळे वैशिष्ट्य आहे. या संदर्भात ट्यू-सूद कंपनीचे प्रादेशिक व्यवस्थापक सुनील जोशी यांनी, आयएसओ मानांकनासाठी एखाद-दुसऱ्या विभागाऐवजी संपूर्ण विद्यापीठ म्हणून सामोरे जाण्याचा शिवाजी विद्यापीठ प्रशासनाचा निर्णय खरोखरीच धाडसी होता. तथापि, त्या धाडसामुळेच आयएसओ मानांकन प्राप्त झाले, असे गौरोद्गार काढले. इथून पुढेही एक व्यावस्था म्हणून सातत्याने प्रगत होत जाणे, कार्यक्षमता, परिणामकारकता, सातत्यपूर्णता आणि या सर्वांमध्ये शाश्वतता या सर्व बाबी अत्यंत महत्त्वाच्या आणि कळीच्या ठरणार आहेत, असेही कुलगुरू डॉ.देवानंद शिंदे सांगितले आहे.

VIDEO:सातारा पोटनिवडणूक होणार नाही, उदयनराजेंबद्दल भाजपची पहिली प्रतिक्रिया

Published by: Sandip Parolekar
First published: September 21, 2019, 8:58 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading