मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

BJPमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर, गाडीचा दरवाजा आदळून निघून गेले खासदार

BJPमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर, गाडीचा दरवाजा आदळून निघून गेले खासदार

संजयकाका बैठकीला आले, तेव्हा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पदाधिकारी बदलासाठी अध्यक्षांच्या बंगल्यावर गेले होते. ही गोष्ट समजताच खासदार संजयकाकाही चर्चेसाठी बंगल्यावर गेले. मात्र, अवघ्या दोन मिनीटातच ते बाहेर आले.

  • Published by:  Kiran Pharate

सांगली 15 फेब्रुवारी : भारतीय जनता पक्षातील (BJP) अंतर्गत वाद आता चांगलाच पेटलेला दिसत आहे. रविवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) सांगलीत गेले होते. मात्र, खासदार संजयकाका पाटील (Sanjaykaka Patil) कार्यक्रमाला गैरहजर होते. विजयनगरच्या एका हॉटेलमध्ये पक्षाच्या सुकाणू समितीची बैठक होती. बैठक संपण्याच्या वेळी संजयकाका तिथे आले, मात्र तडकाफडकी निघूनही गेले, त्यामुळे सगळीकडे हिच चर्चा रंगल्याचं पाहायला मिळालं.

संजयकाका बैठकीला आले, तेव्हा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पदाधिकारी बदलासाठी अध्यक्षांच्या बंगल्यावर गेले होते. ही गोष्ट समजताच खासदार संजयकाकाही चर्चेसाठी बंगल्यावर गेले. मात्र, अवघ्या दोन मिनीटातच ते बाहेर आले. यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड राग दिसत होता.

बाहेर उभा असणाऱ्या जिल्हा परिषद पदाधिकारी आणि सदस्यांनी खासदार पाटील यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना काहीच उत्तर न देता पाटील गाडीचा दरवाजा जोरात बंद करत आतमध्ये बसले. ते प्रचंड रागात असल्याचे हे संकेत होते. इतक्यात एक व्यक्ती गाडीजवळ पळत आला आणि दादा परत बोलवत असल्याचं सांगितलं, मात्र राग अनावर झालेल्या पाटील यांनी तिथून काढता पाय घेतला. यानंतर या घटनेची सांगलीच्या राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगल्याचं पाहायला मिळालं.

वाद नेमका काय -

सांगलीतील जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदलासाठी खासदार पाटील गेल्या काही दिवसांपासून आग्रही होते. बदलाचा निर्णय तात्काळ घेत माझ्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी, अशी त्यांची मागणी होती. मात्र, चंद्रकांत पाटलांनी हा निर्णय लवकर घेतला नसल्यचा पाटील यांना राग आला. जिल्हा परिषदेआधी महापालिकेकडे चंद्रकांत पाटलांनी लक्ष दिल्यानं खासदार नाराज असल्याची माहिती काही सदस्यांनी दिली आहे.

First published:

Tags: BJP, Chandrakant patil, Sangli news