इंदुरीकर महाराज निवडणूक लढवणार? संगमनेरात बसले मुख्यमंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून

इंदुरीकर महाराज निवडणूक लढवणार? संगमनेरात बसले मुख्यमंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून

प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर महाराज विधानसभा निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

  • Share this:

हरीष दिमोटे, (प्रतिनिधी)

अहमदनगर, 14 सप्टेंबर:राज्यातील घराघरात आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मनामनात पोहचलेले प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर महाराज विधानसभा निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. संगमनेरात पोहोचलेल्या भाजपच्या महाजनादेश यात्रेच्या व्यासपीठावर मुख्यमंत्र्यांशी हितगूज साधणारे इंदुरीकर महाराज भाजपच्या तिकिटावर थेट कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांविरोधात निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात आहे.

सोशल मीडिया असो की जाहीर कीर्तन आघाडीवर नाव असलेले नाव म्हणजे निवृत्ती महाराज इंदुरीकर... महाराज म्हणे राजकारणात उतरणार आहेत? हो अशीच जोरदार चर्चा नगर जिल्ह्यात सुरू झाली आहे. आता हेच बघा ना.. शुक्रवारी भाजपची महाजनादेश यात्रा थोरातांचा बालेकिल्ला असलेल्या संगमनेरात पोहोचली होती. इंदुरीकर महाराज मुख्यमंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले दिसले. बराचवेळ दोघांमध्ये हितगुजही झाले. पण त्यामुळे मात्र सगळीकडे वेगळीच कुजबूज सुरू झाली आहे. इंदोरीकर महाराज संगमनेरमधून थेट बाळासाहेब थोरातांच्या विरोधात निवडणुक लढवणारस अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मात्र, याबाबत इंदुरीकर महाराज यांनी कोणताही दुजोरा देण्यात आला. तरी धार्मिक संप्रदायातील लोक या गोष्टीच समर्थन करताना दिसत आहेत.

बाळासाहेब थोरातांच्या विरोधात महायुतीकडे सर्वमान्य असा एकही चेहरा आज दिसत नाही आहे. त्यामुळे लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या इंदोरीकरांच नाव समोर येताना दिसत असल्याचे शिर्डीचे काशिकानंद महाराज यांनी सांगितले आहे. समाजसेवा हेच व्रत संतानीही अंगिकारलं आहे तर राजसत्ता आणि धर्मसत्ता एकत्र येवून समाजसेवा करणे उचित असल्याने आम्ही अशा लोकांच्या पाठीशी असल्याचे वारकरी संप्रदायातील सेवक म्हणत आहेत. वारकरी संप्रदायातील लोकही इंदुरीकर यांनी निवडणूक लढवण्याचे समर्थन करत आहेत. त्यामुळे आता खरंच इंदुरीकर महाराज संगमनेरमधून थोरातांच्या विरोधात निवडणूक लढवणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

SPECIAL REPORT: राजे मंडळींनी राष्ट्रवादीची साथ सोडली; शरद पवार एकटे पडले?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 14, 2019 03:23 PM IST

ताज्या बातम्या