Home /News /maharashtra /

कोल्हापूरात युवासेनेचा राडा, ‘चायना’ नाव असल्यानं हॉटेल पाडलं बंद

कोल्हापूरात युवासेनेचा राडा, ‘चायना’ नाव असल्यानं हॉटेल पाडलं बंद

चीनमुळे देशाला धोका असताना आणि सीमेवर जवान शहीद होत असताना चायना हे नाव का ठेवलं अशी विचारणा युवासैनिकांनी केली. त्यांनी हॉटेलमध्ये जाऊन युवा सैनिकांनी या हॉटेलचा बोर्ड काढून टाकला.

कोल्हापूर 28 ऑक्टोबर: भारत चीन सीमेवर (India China Border) अजुनही तणाव आहे. त्यामुळे चीन विरोधात देशभर अजूनही संतापाची लाट कायम आहे. या संतापाचं लोण थेट कोल्हापूरपर्यंत (Kolhapur)आलं आहे. चायना नावावरून युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी राडा केला. शहरातील चायना डाईन या नावाने सुरू असणारं हॉटेल आज युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडलं. चीनमुळे देशाला धोका असताना आणि सीमेवर जवान शहीद होत असताना चायना हे नाव का ठेवलं अशी विचारणा युवासैनिकांनी केली. त्यांनी हॉटेलमध्ये जाऊन युवा सैनिकांनी या हॉटेलचा बोर्ड काढून टाकला. आणि नाव बदलले तरच हॉटेल सुरू करा असा इशाराही कर्मचाऱ्यांना दिला. युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी अचानक हे आंदोलन केल्याने या भागात काही वेळ तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, भारताचा विश्वासघात करत चीनने गेल्या अनेक महिन्यांपासून सीमेवर कुरापती सुरूच ठेवल्या आहेत. गेल्या 45 वर्षांमध्ये झाल्या नाहीत अशा घटना घडत आहेत. दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीत भारताचे 20 जवान शहीद झाले होते. तर चिनी सैनिकांनाही आपले प्राण गमवावा लागले. त्यामुळे भारतात चीन विरोधात मोठं वातावरण तापलं आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स म्हणजेच CAIT ने एक योजना तयार केली असून त्याला देशभरातल्या व्यापाऱ्यांचाही प्रतिसाद मिळत आहे. भारताची शक्ती क्षीण करण्याचा प्रयत्न; चीनच्या नौदलात काय आहे विशेष? दिवाळी हा देशातल्या सर्वात मोठा सण असल्याने त्यादरम्यान लोक सर्वात जास्त खरेदी करत सतात. या काळात गेल्या काही वर्षांमध्ये 70 हजार कोटींचा व्यवसाय होतो. त्यात जवळपास 40 हजार कोटींच्या वस्तूंची आयात ही चीनमधून होत असते. यार्षी ही चीनमधून वस्तूच आयात करायच्या नाहीत असा निर्णय या व्यापाऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे चीनला 40 हजार कोटींचा मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. भारतानं सोडला लडाख सीमेवर पकडलेला जवान, चिनी सैन्यानं मानले आभार शोभेच्या वस्तू, पूजेचं सामान, ईलेक्ट्रीक गॅझेट्स, वीजेच्या माळांपासून ते फटाक्यांपर्यंत सगळ्याच वस्तू स्वस्त असल्याने चीनमधून आयात केल्या जात होत्या. मात्र आता बदलल्या परिस्थितीत ही आयात न करता भारतातल्याच वस्तूंना प्राधान्य देण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला आहे. अशी माहिती कॅटचे अध्यक्ष बी. सी. भरतिया आणि महासचिव प्रविण खंडेलवाल यांनी दिली आहे.

तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

Published by:Ajay Kautikwar
First published:

Tags: India china, Kolhapur

पुढील बातम्या