Home /News /maharashtra /

अमिर खान म्हणतो, चार दिवस बारामतीत मला मुक्कामाला यायचं

अमिर खान म्हणतो, चार दिवस बारामतीत मला मुक्कामाला यायचं

'पवारांनी उभं केलेलं काम अतिशय भव्य आहे. गेली काही वर्ष मला हे प्रदर्शन पाहण्याची इच्छा होती. पण येणं होत नव्हतं. आज हे सगळं पाहिलं आणि थक्क झालो.'

बारामती 17 जानेवारी : बारामतीतील शारदानगर येथील 110 एकर मधील कृषी विज्ञान केंद्र आयोजित कृषिक शेती प्रदर्शन आज पासून सुरू झाली. या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार , कृषी मंत्री दादासाहेब भुसे कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार खासदार सुप्रीया सुळे व सिने अभिनेता अमिर खान उपस्थित होते. अमिर खानने अतिशय उत्सुकतेने सगळ्या स्टॉल्सला भेट दिली आणि माहिती जाणून घेतली. नंतर झालेल्या कार्यक्रमात शरद पवारांच्या उपस्थित त्याने आपलं मनोगतही व्यक्त केलं. अमिर खान म्हणाले, पवारांनी उभं केलेलं काम अतिशय भव्य आहे. गेली काही वर्ष मला हे प्रदर्शन पाहण्याची इच्छा होती. पण येणं होत नव्हतं. आज हे सगळं पाहिलं आणि थक्क झालो. एका दिवसांमध्ये हे सगळं पाहणं आणि समजून घेणं शक्यच नाही. इथलं सगळं काम पाहण्यासाठी किमान चार दिवस बारामतीत मला मुक्कामी यायचं आहे अशी भावनाही अमिर खानने व्यक्त केली. अजित दादा 'स्टेपनी', या वादानंतर उद्धव ठाकरेंचं बारामतीत मोठं वक्तव्य उद्धव ठाकरेंचं सूचक वक्तव्य प्रदर्शन पाहण्यासाठी जाताना अजित पवार हे गाडी चालवत होते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काही वेळ गाडीत बसले. त्यावेळी गाडीत बसताना ठाकरे म्हणाले, आमच्या गाडीच्या चाव्या या अजित दादांकडेच आहेत. यावेळी अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आले होते मात्र ते काहीच बोलले नाहीत. उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, मी इथे पाहायला ऐकायला आलो आहे. पण मुख्यमंत्री आहे म्हणून कळो न कळो बोलावं लागतं. तंत्रज्ञान वगैरे शब्द वापरले की लोकांना वाटतं मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन केलं. आता व्हर्टिकल गार्डन सोबत व्हर्टिकल शेती आलीय. काँग्रेसला अंडरवर्ल्डचं फंडिंग होतं का? फडणवीसांची काँग्रसेला प्रश्नांची सरबत्ती महाराष्ट्राच्या भूमी चमत्कार जन्माला येतो. चंद्रपूरच्या शेतकऱ्याने तांदळाची जात, वाण आणलं त्याला घड्याळाचं नाव दिलं HMT. मला सुप्रियाने विचारलं तुमचं घड्याळाचे दुकान आहे का? मी म्हटलं नाही. घड्याळ वाले माझे पार्टनर आहेत. वेळ यावी लागते. योग्य वेळी सत्ता आली आहे. यामुळं आता सुजलाम सुफलाम करून दाखवू. मी सुद्धा बारामतीला येत जात राहणार आहे. सगळे बरोबर आहेत. अजित दादाही आहेत.
Published by:Ajay Kautikwar
First published:

Tags: Aamir khan, Sharad pawar

पुढील बातम्या