पंढरपूर 27 फेब्रुवारी : नवरा बायकोमध्ये भांडण झालं. त्या भांडणाचा राग बायकोला आला. तिने आपल्या दीड वर्षाच्या चिमुकल्याला सोबत घेतलं. त्या रागाच्या भरात दोन मुलांची आई असलेली ती महिला घराशेजारच्या विहिरीजवळ गेली आणि तिने त्यात उडी घेऊन आत्महत्या केली. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील भोसेती या गावत ही धक्कादायक घटना घडलीय. विवाहित महिलेने मुलांसह घरगुती किरकोळ वादातून विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय. कचरेवाडी शिवारातील शेतकरी सुरेश कट्टे यांच्या शेतात पप्पू मोरे व विश्रांती मोरे हे दाम्पत्य गेल्या 4 वर्षेपासून शेतात मजुरी करून उदरनिर्वाह करत होते.
मंगळवारी रात्री 10 च्या सुमारास अज्ञात कारणावरून घरात पती- पत्नीत भांडण झाले. वारंवार उडणारे खटके आणि नवऱ्याची शिविगाळ याचा विश्रांतीला कंटळा आला होता. तोच संताप डोक्यात तिचा राहिला आणि त्यातूनच तिने टोकाचा निर्णय घेतला. त्या रागाच्या भरात रात्री 2 वाजता विश्रांतीने (वय 25) लहान मुलगा प्रतिक (वय दीड वर्ष) याला सोबत घेतलं. त्यांचं घर हे शेतातल्या विहिरी शेजारीच होतं. विहीर खोल होतं. त्यात तब्बल 40 फुट पाणी होतं.
ठाकरे सरकारचा भाजपला आणखी एक दणका, 'हा' निर्णय केला रद्द
त्याच वहिरीत विश्रांतीने चिमुकल्या प्रतिकसह उडी टाकून आत्महत्या केली. विहीरीत मोठ्या प्रमाणात पाणी आसल्याने त्यात दोघांचाही मृत्यू झाला. सकाळी या घटनेची माहिती कळली आणि एकच खळबळ उडाली. पाणी खोल असल्याने मृतदेह बाहेर काढण्यासाठी वेळ लागला. पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून घटनेची चौकशी सुरू केलीय.
हेही वाचा...
...आणि खासदार नवनीत राणांनी अधिकाऱ्यांना घेतलं फैलावर!