संतापजनक! मित्रांसोबत शरीरसंबंध ठेवण्यासाठी पत्नीवर दबाव, पतीने मित्रांसह केली बेदम मारहाण

संतापजनक! मित्रांसोबत शरीरसंबंध ठेवण्यासाठी पत्नीवर दबाव, पतीने मित्रांसह केली बेदम मारहाण

मात्र पीडित महिलेने त्यांना दाद न देता विरोध केला. त्यामुळे तिच्या पतीने व चार मित्रांनी तिला लोखंडी रॉडने आणि पट्ट्याने मारहाण केली.

  • Share this:

 सुमित सोनवणे, लोणी काळभोर 23 ऑक्टोबर: आपल्या मित्रांसोबत शरीर संबंध ठेवत नाही म्हणून तिच्या पतीच्या चार मित्रांनी एका विवाहित महिलेस लोखंडी रॉड आणि पट्ट्याने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उरुळी कांचन मध्ये घडलीय. या घटनेनंतर पाच जणांविरोधात विनयभंगाचा गुन्हा लोणी काळभोर पोलिस स्टेशनमधे दाखल करण्यात आला आहे.

दौंड तालुक्यातील सहजपुरचं असलेलं हे दाम्पत्य सध्या उरुळी कांचन येथे भाड्याच्या घरात राहत होते. दरम्यान तिच्या पतीचे मित्र घरात येत होते हे रात्री अकरा वाजता त्यांच्या घरी आले आणि त्यांनी त्या महिलेला शरीर संबंधाची मागणी करत तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला.

मात्र पीडित महिलेने त्यांना दाद न देता विरोध केला. त्यामुळे तिच्या पतीने व चार मित्रांनी तिला लोखंडी रॉडने आणि पट्ट्याने मारहाण केली. यामध्ये पीडित महिला जखमी झाली आणि त्यानंतर ते चार जण निघून गेल्यावर तिच्या पतीने तिला पुन्हा मारहाण करण्यास सुरुवात केली.

घरातला गोंधळ ऐकून घरमालक तिथे आला आणि त्याने हस्तक्षेप केल्याने त्या महिलेचा जीव वाचला.

हा अन्याय असह्य झाल्याने पीडित महिलेने आपल्यावर झालेल्या अत्याचाराविरुध्द लोणी काळभोर पोलिसात फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन चौधरी तपास करीत आहेत.

या विकृत पती आणि त्याच्या नराधम मित्रांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी महिला संघटनांनी केली आहे. राज्यात महिलांवरच्या अत्याचारांमध्ये वाढ होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 23, 2020, 9:28 PM IST
Tags: women

ताज्या बातम्या