संशयाचं भूत.. अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीने पत्नीच्या गळ्यावर कटरने केले वार

संशयाचं भूत.. अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीने पत्नीच्या गळ्यावर कटरने केले वार

मुलीने वडिलांच्या हातातील धारदार कटर हिसकावून घेतल्याने मोठा अनर्थ टळला.

  • Share this:

कोल्हापूर,17 ऑक्टोबर: गारगोटी येथील अवधूत कॉलनीत अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीने पत्नीवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. आरोपी फरार असून त्याच्या विरूद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

मिळालेली माहिती अशी की, किशोर शिवराम कांबळे (45) असे आरोपीचे नाव आहे. तो महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळात वाहक पदावर कार्यरत आहे. पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा किशोर कांबळे याला संशय होता. यातून त्याने बुधवारी पत्नीशी वाद घातला. वाद विकोपाला जाऊन त्याने थेट पत्नीवर हल्ला केला. तिचे तोंड दाबून तिच्या गळ्यावर कटरने वार केले. वर्मी हल्ल्यामुळे महिलेची प्रकृती चिंताजनक आहे. तिच्यावर कोल्हापूरमधील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

मुलीने हिसकावले कटर... मोठा अनर्थ टळला

भुदरगड पोलिस स्टेशनचे निरीक्षक संजय पतंगे यांनी सांगितले की, कांबळे दाम्पत्याला दोन मुले आहेत. आईवर वडिलांनी जीवघेणा केला, तेव्हा मुलीने वडिलांच्या हातातील धारदार कटर हिसकावून घेतल्याने मोठा अनर्थ टळला. कांबळे तिच्या पत्नीवर कायम संशय घेत होता. यावरून त्यांच्यात सतत भांडण होत होते. त्याने पत्नीला अनेकदा मुलांसमोर मारहाणही केली होती. नातेवाईकांनी दाम्पत्यामध्ये समेट घडवून आणला होता. तरी देखील कांबळेच्या डोक्यातून संशयाचे भूत गेले नाही. त्यातून त्याने हा हल्ला केल्याचे बोलले जात आहे.

VIDEO : हर्षवर्धन जाधव बावळट आणि मनोरुग्ण, चंद्रकांत खैरेंचा पलटवार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 17, 2019 06:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading