खुरप्याने केले सपासप वार.. पत्नी जीव सोडत नाही तोपर्यंत पती बसला जवळच

मलगोंडा याने रागाच्या भरात खुरप्याने पत्नीच्या गळ्यावर, तोडांवर आणि डोक्यात वार केले.

News18 Lokmat | Updated On: Oct 31, 2019 10:02 PM IST

खुरप्याने केले सपासप वार.. पत्नी जीव सोडत नाही तोपर्यंत पती बसला जवळच

सांगली,31 ऑक्टोबर: क्षुल्लक घरगुती वादातून पतीने पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सांगली येथील पवार गल्लीत बुधवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. मलगोंडा पाटील असे आरोपीचे नाव असून त्याने रागाच्या भरात खुरप्याने पत्नीच्या गळा, चेहरा आणि डोक्यावर सपासप वार केले. त्यात पत्नीचा जागेवरच मृत्यू झाला. सुमन पाटील (वय-50) असे मृत महिलेचे नाव आहे. हत्येनंतर आरोपी स्वत:हून पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला.

पत्नी जीव सोडत नाही तोपर्यंत पती बसला जवळच...

मिळालेली माहिती अशी की, मलगोंडा आणि सुमन यांच्या कायम वाद होत होते. या वादातूनच ही हत्या झाली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मलगोंडा याने रागाच्या भरात खुरप्याने पत्नीच्या गळ्यावर, तोडांवर आणि डोक्यात वार केले. हत्येनंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पत्नीचा जोपर्यंत मृत्यू होत नाही तोपर्यंत तो तिच्या जवळच बसला होता. सुमनचा पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर त्याने घराला कुलूप लावले आणि स्वत:हून पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला.

या घटनेची माहिती समजताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. मलगोंडा पाटील हे एक शेतमजूर म्हणून काम करतात. त्याने इतके टोकाचे पाऊल का उचलले, याचा पोलीस तपास करत आहे.

उसणवारीचे पैसे मगितल्याच्या रागातून दगडाने ठेचून खून

Loading...

उसणवारीचे पैसे मागितले म्हणून एकाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बाळू बजरंग पवार (वय-40, रा. कोष्टी गल्ली, खर्डा, ता.जामखेड) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे जामखेड तालुक्यातील खर्डा गावात तणाव परसला आहे. या प्रकरणी सुधीर बाळू वाळस्कर, आकाश बाळू वाळस्कर, योगेश बलभीम वाळस्कर, रोहित उर्फ बबलू बाळासाहेब गोलेकर, गौतम राहुल तादगे (सर्व रा. खर्डा, ता. जामखेड) या पाच जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

VIDEO:राज्यपालांच्या भेटीनंतर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 31, 2019 10:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...