मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

नदीच्या पात्रात जिवंत गुरं वाहून गेली, VIDEO पाहून उडेल थरकाप

नदीच्या पात्रात जिवंत गुरं वाहून गेली, VIDEO पाहून उडेल थरकाप

सोलापूर जिल्ह्यात NDRFच्या तीन टिम्स दाखल झाल्या असून त्यांनी आज दिवसभर मदत आणि बचाव कार्य करत 150 जणांना वाचवलं आहे. त्याच 40 ते 45 मुलांचा समावेश असल्याचं NDRFच्या वतीने सांगण्यात आलं आहे.

सोलापूर 15 ऑक्टोबर: मुसळधार पावसाने राज्याला झोडपून काढलं आहे. सोलापूर जिल्ह्याला पावसाचा प्रचंड मोठा फटका बसला. नदी, नाले, तुडूंब भरून वाहू लागले आहे. पाण्याचा प्रवाह एवढा प्रचंड होता की त्यात अनेक शेतीचं प्रचंड मोठं नुकसान झालं. पुरामुळे नदीपात्र ओव्हर फ्लो झालं आणि ते पाणी शेतामध्ये घुसलं. माढा मोहोळ अक्कलकोट पंढरपूर मध्ये पशूधनाचे नुकसान झालं आहे. सोलापूर जिल्ह्यात NDRFच्या तीन टिम्स दाखल झाल्या असून त्यांनी आज दिवसभर मदत आणि बचाव कार्य करत 150 जणांना वाचवलं आहे. त्याच 40 ते 45 मुलांचा समावेश असल्याचं NDRFच्या वतीने सांगण्यात आलं आहे. दरम्यान, नदीच्या पूरामध्ये गुरांचा अख्खा कळपच वाहून गेला आहे. याबाबतचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.   पाण्याच्या प्रवाहाचा वेग आणि वाहून जाणारी असाहाय गुरं पाहिली की थरकाप उडाल्याशीवाय राहत नाही. या व्हिडीओ नेमका कुठला आहे त्याबाबत वेगवेगळ दावे करण्यात येत आहेत. त्याचबरोबर तो गेल्या दोन दिवसांपासून असलेल्या पावसातला आहे की या आधी आलेल्या पावसातला याबाबतही तर्कवितर्क लावले जात आहेत. पण त्या व्हिडीओमधल्या दृश्यांची तीव्रता ही मोठी असून त्यावर पावसाच्या भयावहतेचा अंदाज येऊ शकतो. दरम्यान, माढा तालुक्यातील वाकाव या गावाला सीना नदीच्या पाण्याने वेढा दिलाय. त्यामुळे गावातील अनेल लोक पाण्यात अडकले होते. सीना नदीच्या पात्रापासून वाकाव गाव एक किलोमीटर अंतरावर आहे. मात्र गावात दहा फुटाहून अधिक पाणी साचले आहे. त्यामुळे लोक घरावर जाऊन जीव मुठीत घेऊन बसले आहेत. अनेक जनावरे पाण्यात वाहून गेली आहेत तर संपूर्ण बागाच्या बागा पाण्याखाली आहेत. जिल्हा प्रशासनाची यंत्रणा तोकडी पडत आहेत. कारण मोहोळ, माढा तालुक्यातील शेकडो गावं पाण्याखाली गेले आहेत.
First published:

Tags: Rain flood, Solapur (City/Town/Village)

पुढील बातम्या