आता नियम मोडणाऱ्या खासगी हॉस्पिटल्सची खैर नाही, आरोग्य मंत्र्यांचा निर्वाणीचा इशारा

आता नियम मोडणाऱ्या खासगी हॉस्पिटल्सची खैर नाही, आरोग्य मंत्र्यांचा निर्वाणीचा इशारा

राज्याची गरज लक्षात घेऊन सरकार नव्या 500 Ambulance खरेदी करणार आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांना मदत होणार आहे.

  • Share this:

कोल्हापूर 9 ऑगस्ट: देशात महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वात जास्त उद्रेक (Mharashtra Coronavirus) आहे. त्यामुळे राज्य सरकार युद्धपातळीवर कोरोनाला रोखण्यासाठी प्रयत्न करत आहे. सर्व सरकारी हॉस्पिटल्स कोरोना रुग्णांवर उपचार करत असतांना खासगी हॉस्पिटल्सनांही सरकारने काही नियम घालून दिले आहेत. या नियमांचं पालन न करणाऱ्या हॉस्पिटल्सवर कारवाई करण्यात येईल असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे Health Minister (Rajesh Tope) यांनी दिला आहे.

राजेश टोपे म्हणाले, खासगी रुग्णालय पेशंटना तपासात नाहीत अशा तक्रारी येत आहेत. असं करणं हे अत्यंत चुकीचं आहे. अशा तक्रारींमध्ये तथ्य आढळल्यास कडक करावाई करण्यात यईल असा इशाराही त्यांनी दिला. खासगी हॉस्पिटल्सनी Antigen kit ठेवल्या पाहिजेत असं मतही त्यांनी व्यक्त केलं. राज्याची गरज लक्षात घेऊन सरकार नव्या 500 Ambulance खरेदी करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

राज्यात शनिवारी तब्बल 12822 नवीन रुग्ण आढळून आलेत. 275 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यातील मृत्यूदर 3.45 टक्के इतका एवढा झाला आहे. तर 11081 रुग्णांना घरी डिस्चार्ज दिला, आत्तापर्यंत 3 लाख 38 हजार 362 रुग्ण बरे झाले असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 67. 26 टक्के इतके आहे. राज्यात एक लाख 47 हजार 48 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. सर्वाधिक ऍक्टिव्ह रुग्ण 41 हजार 266 पुणे येथे असून त्यानंतर  22943 ठाणे येथे आहेत. राज्यातल्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही आता 5 लाख 3 हजार 084 एवढी झाली आहे.

मृतदेहावर अंत्यसंस्कार अंत्यसंस्कार करता करता कोरोना वॉरियरची अशी झाली अवस्था PH

राज्यात सध्या नऊ लाख 89 हजार 612 व्यक्ती स्वतंत्र विलगीकरण असून 35 हजार 626 व्यक्ती संस्थात्मक विलगीकरन मध्ये आहेत. मुंबई 19900 14 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान, भारतात सध्या बायोटेक कंपनीच्या लशीची चाचणी सुरू आहे. तर ऑक्सफोर्डने तयार केलेल्या लशीची चाचणी तिसऱ्या टप्प्यात आहे.

अधिकारी ऐकत नसतील तर दंगा करा; काँग्रेस मंत्र्यांच्या सल्ल्यानं सगळेच चक्रावले

कोरोनावरची लस भारतात उपलब्ध व्हावी यासाठी मोदी सरकार प्रयत्नशील आहे. ही लस प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी सरकार काय आणि कशी योजना तयार करत आहे जाणून घ्या.

Published by: Ajay Kautikwar
First published: August 9, 2020, 3:35 PM IST

ताज्या बातम्या