गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणी आणखी तिघांना अटक, सचिन अंदुरेने केले हे आरोप

गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणी आणखी तिघांना अटक,  सचिन अंदुरेने केले हे आरोप

ज्येष्ठ पुरोगामी नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणी विशेष तपास पथकाने (एसआयटी) आणखी ती संशयिताना अटक केली आहे.

  • Share this:

संदीप राजगोळकर,(प्रतिनिधी)

कोल्हापूर, 6 सप्टेंबर: ज्येष्ठ पुरोगामी नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणी विशेष तपास पथकाने (एसआयटी) आणखी ती संशयिताना अटक केली आहे. सचिन अंदुरे याला पुण्यातील येरवडा तुरुंगातून तर अमित बद्दी आणि गणेश मिस्किन या दोघांन मुंबईतील आर्थर रोड तुरुंगातून शुक्रवारी पहाटे एसआयटीने ताब्यात घेतले. या कारवाईमुळे गोविंद पानसरे हत्या प्रकरणात अटक झालेल्या आरोपींची संख्य आता 12 झाली आहे.

डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणातील संशयित सचिन अंदुरे आणि गौरी लंकेश हत्या प्रकरणातील दोन संशयित आरोपी गणेश मिस्कीन आणि सचिन बद्दी अशा तिघांना कोल्हापूर जिल्हा कोर्टाने 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

सचिन अंदुरे याला यापूर्वी सीबीआयने अटक केली होती. या दरम्यान दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) नालासोपारा येथून मोठा शस्त्रसाठाही जप्त केला होता. या चौकशीतून सचिन अंदुरे, अमोल काळे आणि शरद करळसकर या तिघांनी डॉ. दाभोलकर यांची हत्या केल्याचे समोर आले होते.

तपासाधिकाऱ्यावर सचिन अंदुरेने केले हे आरोप..

कोर्टात सुनावणीवेळी संशयित आरोपी सचिन अंदुरे यांन तपासाधिकारी तिरुपती काकडे यांनी छळ केल्याचा धक्कादायक आरोप केला. सीबीआय कोठडीत असतानाही मध्यरात्री तीन वाजेपर्यंत तिरुपती काकडे यांनी छळ केल्याचा दावा त्याने केला. दरम्यान, शुक्रवारी दुपारी 12 वाजता कडेकोट पोलिस बंदोबस्तात तिघांना कोल्हापूरच्या कोर्टात आणण्यात आले. सरकारी वकिलांनी 15 दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली. मात्र, कोर्टाने तिघांना 10 दिवसांची पोलिस कोठडी दिली. दरम्यान सुनावणी झाल्यानंतर संशयित आरोपींना पोलिसांनी अज्ञात स्थळी हलवले होते. मात्र, रिमांड चार्टवर आरोपींच्या स्वाक्षरी राहिल्यामुळे त्यांना पुन्हा कोर्टात आणण्यात आले. यावेळी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली.

VIDEO : किल्ले पार्ट्यांसाठी देणार का? आव्हाडांचा सरकारवर हल्लाबोल

First published: September 6, 2019, 6:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading