पूरग्रस्त भागातल्या मुलींच्या लग्नाची आता चिंता नको, कारण...

पूरग्रस्त भागातल्या मुलींच्या लग्नाची आता चिंता नको, कारण...

'दानशूर व्यक्तिंच्या मदतीने आम्ही लग्नाचा सर्व खर्च करू, गरजू कुटुंबांनी आमच्याशी संपर्क साधावा.'

  • Share this:

मुंबई 3 सप्टेंबर : कोल्हापूर आणि सांगली भागात आलेल्या महापूरामुळे अनेक संसार उघड्यावर पडलेत. त्यांच्या पुनर्वसनाचं काम सध्या जोरात सुरू आहे. या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आता राज्य सरकारने हात दिलाय. ज्या कुटुंबांमध्ये मुलींची लग्न आहेत. पण ते करू शकत नाहीत अशा कुटुंबांतल्या मुलींची लग्न राज्य सरकारतर्फे लावून देण्यात येणार असल्याचं कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. दानशूर व्यक्तिंच्या मदतीने आम्ही लग्नाचा सर्व खर्च करू असंही त्यांनी म्हटलं आहे. अशा कुटुंबींनी आमच्या संपर्क साधावा असं आवाहनही त्यांनी केलंय.

पाटील म्हणाले महापूरानेग्रस्त असलेल्या भागातल्या शाळांची मोठ्या प्रमाणावर पडझड झालीय. त्या भागातल्या सर्व शाळांची दुरुस्ती भाजपतर्फे करून देण्यात येणार आहे. त्यासाठी पक्षाचे सर्व लोकप्रतिनिधी आपलं एक महिन्याचं वेतन देणार आहेत. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने पूरग्रस्त भागतल्या मंदिरांची दुरुस्ती आणि पुनर्निर्माण करण्याचा निर्णय घेतलाय. तर पिंपरी चिंचवडचे आमदार महेश लांडगे हे पूरामुळे ज्या तालमी खराब झाल्यात त्या दुरुस्त करून देणार आहे.

शिवसेनेत येण्यासाठी शिवसैनिकांचं छगन भुजबळांना साकडं!

विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा

विदर्भात पुढील दोन दिवस मुसळाधार पावसाचा अंदाज आहे. नागपूर हवामान विभागाने हा मुसळाधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. विदर्भाच्या बऱ्याच भागात मंगळवारी संततधार पावसाचा अंदाज आहे. हा पाऊस पुढचे काही दिवस अशाच प्रकारे कायम राहणार असल्याची माहिती हवामान विभागाचे संचालक मोहनलाल शाहू यांनी दिली आहे. विदर्भात मान्सून दाखल झालेला असला तरीही अद्याप नागपूर जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. रविवारी, सोमवार आणि मंगळवारी नागपुरात पाऊसच झाला नाही. मात्र, बुधवारी नागपुरात चांगल्या पावसाची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहेत. विघ्नहर्ता गणरायाचे आगमन होताच कालपासून नागपूर शहरात पावसाच्या सरी कोसळायला सुरुवात झाली.

परभणीत पाऊस आला आणि शेतकऱ्यांच्या जीवात जीव!

सायंकाळी पाच वाजता सर्वत्र काळोख पसरलेला होता. पावसाच्या रिमझिम सरी कोसळत आहेत. पावसाच्या सरी नागपूर शहरासह इतरही भागात पडत आहेत. यंदा मान्सूनचे आगमन मुळात देशातच उशिराने झाले. पण आज व उद्या चांगल्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. गेल्या काही दिवसंपासून पावसाने दडी मारल्याने काही प्रमाणात वातावरणात उकाडा जाणवत होता मात्र सकाळ पासून रिमझिम सरी कोसळत असल्यामुळे वातावरणात गारवा जाणवत आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: September 3, 2019, 8:10 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading